Kolhapur MahaPalika Nivadnuk : कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसकडून शुक्रवारी (26 डिसेंबर) रात्री उशीरा पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीमध्ये एकूण 48 उमेदवारांची घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी केली. यामुळे गेले अनेक दिवस काँग्रेसकडून देव पाण्यात घालून बसलेल्या इच्छुकांचा जीव अखेर भांड्यात पडला आहे. आता उर्वरित जागांची यादी येत्या 2 दिवसांत जाहीर होणार असल्याने याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.
काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अडचणीच्या नसणाऱ्या प्रभागात उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला प्रभाग क्रमांक एक, तीन, पाच, सात, दहा यासह अन्य काही मतदारसंघांमध्ये इच्छुकांची नावाची घोषणा केलेली नाही. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक उमेदवारीची मागणी करण्यात आली होती. जवळपास 350 हुन अधिक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. त्यामध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये 4 जागांसाठी 40 इच्छुकांनी मागणी केली होती. मात्र ज्या जागांवर इच्छुकांची मागणी अधिक आहे त्या जागांवर बंडखोरांची धास्ती असल्याने पहिल्या यादीमध्ये अशा प्रभागातील उमेदवारांची नावे जाहीर न करण्याची खबरदारी काँग्रेसने घेतलेली दिसून येते.
दरम्यान काँग्रेसकडून ही यादी रात्री 10 वाजता जाहीर करण्यात येणार होती. मात्र अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्षेप घेतल्याची चर्चा होती. शिवाय काही जागांबाबत कुणकुण लागल्याने नाराजी व्यक्त करत आक्रमक राहण्याची भूमिका घेतली होती. अखेर त्यावर तोडगा काढून उशीरा काँग्रेसकडून पहिल्या 48 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात प्रभाग क्रमांक 4, 8, 12 आणि 20 या इथल्या सर्व उमेदवारांची घोषणा केली आहे.
मनसेचा एकमेव नगरसेवक सतेज पाटलांच्या गळाला :
दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेत मागील निवडणुकीत निवडून आलेले अपक्ष उमेदवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले हे सतेज पाटील यांच्या गळाला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिंडोर्ले हे भाजपच्या आणि काँग्रेसच्या संपर्कात होते. दोन्हीही पक्षाकडे त्यांनी पुरस्कृत उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. प्रभाग क्रमांक 20 मधून ते सर्वसाधारण गटातून इच्छुक होते. मात्र महायुतीकडे सर्वसाधारण गटामधून शिवसेना या जागेचा दावा सोडत नसल्याने अखेर दिंडोर्ले हे सतेज पाटील यांच्यासोबत गेले. काँग्रेसकडून त्यांना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली.
प्रभाग क्र. | आरक्षण | उमेदवाराचे नाव
2 | नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला | आरती दीपक शेळके
3 | नागरिकांचा मागास प्रवर्ग | प्रकाश शंकरराव पाटील
3 | सर्वसाधारण महिला | किरण स्वप्निल तहसीलदार
4 | अनुसूचित जाती महिला | स्वाती सचिन कांबळे
4 | नागरिकांचा मागास प्रवर्ग | विशाल शिवाजी चव्हाण
4 | सर्वसाधारण महिला | दिपाली राजेश घाटगे
4 | सर्वसाधारण | राजेश भरत लाटकर
5 | सर्वसाधारण | अर्जुन आनंद माने
6 | अनुसूचित जाती | रजनीकांत जयसिंह सरनाईक
6 | सर्वसाधारण महिला | तनिष्का धनंजय सावंत
6 | सर्वसाधारण | प्रतापसिंह दत्तात्रय जाधव
7 | सर्वसाधारण महिला | उमा शिवानंद बनछोडे
8 | नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला | अक्षता अविनाश पाटील
8 | सर्वसाधारण महिला | ऋग्वेदा राहुल माने
8 | सर्वसाधारण | प्रशांत उर्फ भैया महादेव खेडेकर
8 | सर्वसाधारण | इंद्रजित पांडुरंग बोंद्रे
9 | सर्वसाधारण महिला | पल्लवी सोमनाथ बोळाईकर
9 | सर्वसाधारण महिला | विद्या सुनील देसाई
9 | सर्वसाधारण | राहुल शिवाजी माने
10 | सर्वसाधारण महिला | दिपा दिलीपकर मगदूम
11 | नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला | जयश्री ओंकार चव्हाण
12 | नागरिकांचा मागास प्रवर्ग | रियाज अहमद सुभेदार
12 | सर्वसाधारण महिला | स्वालिया साहिल बागवान
12 | सर्वसाधारण महिला | अनुराधा अभिमन्यू मुळीक
12 | सर्वसाधारण | ईश्वर शांतिलाल परमार
13 | अनुसूचित जाती महिला | पूजा भुपाल शेटे
13 | सर्वसाधारण | प्रविण हरिदास सोनवणे
14 | नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला | दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला
14 | सर्वसाधारण | अमर प्रणव समर्थ
14 | सर्वसाधारण | विनायक विलासराव फाळके
15 | सर्वसाधारण महिला | आश्विनी अनिल कदम
15 | सर्वसाधारण | संजय वसंतराव मोहिते
16 | नागरिकांचा मागास प्रवर्ग | उमेश देवदत्त पाटील
16 | सर्वसाधारण | उत्तम उर्फ भैया वसंतराव शेटके
17 | अनुसूचित जाती महिला | अर्चना संदीप बिरांजे
17 | सर्वसाधारण महिला | शुभांगी शशिकांत पाटील
17 | सर्वसाधारण | प्रविण लक्ष्मणराव केसरकर
18 | अनुसूचित जाती महिला | अरुणा विशाल गवळी
18 | सर्वसाधारण | भुपाल महिपती शेटे
18 | सर्वसाधारण | सर्जेराव शामराव साळुंखे
19 | अनुसूचित जाती | दुर्वास परशुराम कदम
19 | सर्वसाधारण महिला | सुषमा संतोष जरग
19 | सर्वसाधारण | मधुकर बापू रामाणे
20 | अनुसूचित जाती महिला | जयश्री धनाजी कांबळे
20 | नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला | उत्कर्षा आकाश शिंदे
20 | नागरिकांचा मागास प्रवर्ग | धिरज भिवा पाटील
20 | सर्वसाधारण महिला | मयुरी इंद्रजित बोंद्रे
20 | सर्वसाधारण | राजू आनंदराव दिंडोर्ले (पुरस्कृत)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.