Kolhapur Municipal Corporation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Mahanagarpalika : कोल्हापूर महापालिकेचा पुढचा कारभारी 'दक्षिण'मधून? खुर्चीसाठी इच्छुकांनी 'फिल्डिंग' लावली!

Kolhapur mayor race news : कोल्हापूर महापालिकेच्या सत्तेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून दक्षिण भागातील इच्छुकांनी खुर्चीसाठी फिल्डिंग लावली आहे.

Rahul Gadkar

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी ओबीसी आरक्षण राखीव झाल्यानंतर त्या प्रवर्गातून निवडून आलेल्या इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. महायुतीने कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता मिळवल्यानंतर भाजपने महापौर पदावर दावा सांगितला आहे. त्यामुळे भाजपकडे हे पद येणार असल्याने इच्छुकांची धावपळ सुरु आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून आल्याने दक्षिण मध्येच या टर्म मधील पहिला महापौर मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आहे. 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेचे निवडणूक संपल्यानंतर महापौर निवडीला गती येणार आहे.

निवडणूक झाल्यानंतर राज्यातील 29 महानगरपालिकेमधील महापौर पदाची आरक्षण सोडत पार पडली. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग हे महापौर पदासाठी राखीव झाल्याने इच्छुकांची यंत्रणा गतिमान झाली आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक भाजपने जागा मिळवल्यानंतर या पदासाठी भाजपचा आग्रह राहणार आहे. तर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या मतदारसंघातून सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले पहिले सव्वा वर्ष त्यांच्या मतदारसंघात हे पद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता दक्षिणमध्ये लागल्या आहेत. रूपारानी निकम, विजयसिंह खाडे, विजयसिंह देसाई, वैभव कुंभार,सुरेखा औटवकर यांची नावे चर्चेत आहेत.

रूपाराणी निकम या भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतात. गतनिवडणुकीत ताराराणी आघाडीतून नगरसेविका म्हणून विजयी, सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. शिवाय प्रभाग-परिसरात पक्षाच्या कामाची धुरा नेटाने सांभाळली आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. विजयसिंह खाडे - पाटील हे २००० पासून अभाविपमधून भाजप मध्ये सक्रिय आहेत. भाजयुमो जिल्हाध्यक्ष, भाजप जिल्हा सचिव, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहतात. सलग दुसऱ्यांदा भाजपचे नगरसेवक झाले आहेत.

विजयसिंह देसाई हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. फुलेवाडी रिंगरोडपासून संभाजीनगरपर्यंतच्या भागात संपर्क चांगला जनसंपर्क आहे. प्रभाग नऊ, आजूबाजूच्या प्रभाग 20, 8, 18,19 मध्ये जनमत आणि गेल्या तसेच या निवडणुकीत उमेदवारांना मदत करण्याची भूमिका घेतली. भाजपचे संघटन ताकद वाढवण्यास मदत होणार आहे.

वैभव कुंभार हे गेल्या सभागृहात मनीषा कुंभार यांचे चिरंजीव आहेत. या भाजपच्या नगरसेविका, स्वतः भागात भाजपचे काम करणारे असल्याने त्यांची देखील मदत होणार आहे. सुरेखा ओटवकर या मुलगा योगेश ओटवकर हे भाजपचे जुने कार्यकर्ते त्यांच्या मातोश्री आहेत. हि सर्व नाव अधिक चर्चेत आहेत.

भाजपमध्ये दक्षिणमध्ये महापौर पद भाजपचे संघटन ताकत वाढवण्यास त्याची मदत होणार आहे. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय कोल्हापूर उत्तर मध्ये शिवसेनेला तर दक्षिणेत भाजपला अधिक पसंती मतदारांनी दिली आहे. त्यामुळे सहाजिकच भाजप सुरुवातीला दक्षिण मध्येच महापौर पद देण्यास भर देणार आहे. येत्या रविवारी त्यावर महत्वपूर्ण बैठक राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित होणार आहे. 5 फेब्रुवारी नंतरच या पदावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT