

Eknath Shinde News : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शहरांमधील मराठी शाळा, आरोग्यविषयक सुविधा, पर्यावरण, पर्यटन तसेच विविध विकासकामांसाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नगरविकास विभागाने आज याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, नागरी क्षेत्रातील शाळा विशेषतः मराठी शाळा, आरोग्य विषयक सुविधा विशेषतः महिला आरोग्यासाठीच्या उपाययोजना, पर्यावरण, पर्यटन विषयक सुविधा व नागरी स्थानिक संस्थांना आत्मनिर्भर करणाऱ्या उपाययोजना विकसित करण्याच्या उद्देशाने राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
अभियान राबविण्यासाठी "महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी विशेष अनुदान" योजनेंतर्गत प्रत्येक महानगरपालिकेस पाच कोटी व वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान तसेच नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रात अधिसूचित नागरी सेवा व सुविधा पुरविणे योजनेंतर्गत प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायतीस एक कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
सर्व महानगरपालिका व मराठी शाळा असणाऱ्या नगरपरिषदा/नगरपंचायतींनी मंजूर निधीपैकी किमान ५० टक्के निधी मराठी शाळांच्या दर्जीन्त्रतीसाठी वापरणे बंधनकारक असेल. उर्वरित निधीतून आरोग्य विषयक कामे (आरोग्य केंद्र, आरोग्य साहित्य, महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स मशीन, इत्यादी), पर्यावरण व पर्यटन विषयक सुविधा विकसीत करुन त्यातून स्वउत्पन्नात वाढ होईल असे उपक्रम राबविण्यात येतील.
ज्या नगरपरिषद / नगरपंचायतींच्या शाळा नाहीत, अशा नगरपरिषद / नगरपंचायतींनी ५० टक्के निधी आरोग्य विषयक कामांकरीता (आरोग्य केंद्र, आरोग्य साहित्य, महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स मशीन, इत्यादी) वापरणे बंधनकारक आहे व उर्वरित निधीतून पर्यावरण व पर्यटन विषयक सुविधा विकसीत करुन त्यातून स्वउत्पन्नात वाढ होईल, असे उपक्रम राबवावेत, असे शासन निर्णयात म्हटले आहे.
अभियान कालावधी प्रथमतः १ वर्षाचा असेल. या कालावधीत निर्माण होणाऱ्या सुविधांचा आढावा घेऊन अभियान कालावधी वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. अभियानांतर्गत स्पर्धेतून तीन महानगरपालिकांची निवड करण्यात येईल. प्रथम पारितोषिक प्राप्त महानगरपालिकेस दहा कोटी, द्वितीय पारितोषिक प्राप्त महानगरपालिकेस सात कोटी व तृतीय पारितोषिक प्राप्त महानगरपालिकेस पाच कोटी निधीची कामे मंजूर करण्यात येणार आहेत.
प्रत्येक प्रशासकीय विभागाअंतर्गत तीन नगरपरिषद / नगरपंचायतींची निवड करण्यात येईल व प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नगरपरिषद / नगरपंचायतीस पाच कोटी तर द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या नगरपरिषद / नगरपंचायतीस अनुक्रमे तीन कोटी व दोन कोटी निधीची कामे मंजूर करण्यात येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.