Satej Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर महापालिका होणार १०० प्रभागांची : सतेज पाटलांचे संकेत

जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांच्या प्रचारार्थ पाटील यांच्यावतीने शहरात ठिकठिकाणी कटवडा, मिसळ पे चर्चाच्या माध्यमातून मतदारांशी संवाद सुरू केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात जवळची चार-पाच गावे समाविष्ट केली जाणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेचे (Kolhapur Municipal Corporation) १०० प्रभाग होतील असे संकेत पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज (ता. २८) येथे दिले. तसेच प्रभागरचनाही नव्याने करावी लागणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. यामुळे आता कोल्हापूर शहराची बहुचर्चित हद्दवाढ लवकरच होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान पालकमंत्री पाटील यांनी राजकपूर पुतळ्याजवळील शहाजी उद्यानात 'मिसळ पे चर्चा' कार्यक्रमात हे संकेत दिले.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांच्या प्रचारार्थ पाटील यांच्यावतीने शहरात ठिकठिकाणी कटवडा, मिसळ पे चर्चाच्या माध्यमातून मतदारांशी संवाद सुरू केला आहे. त्यातीलच एक भाग म्हणून त्यांनी आज रंकाळा परिसरात कार्यक्रमात आयोजित केला होता. कोल्हापूर शहराची हद्द वाढ गेली अनेक वर्षे झालेली नाही. १९७२ ला महापालिकेची स्थापना झाली. त्यावेळी शहराची जेवढी हद्द होती, तेवढीच आजही आहे.

हद्दवाढ झाली नसल्याने केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी कोल्हापूर पात्र ठरत नाही. परिणामी निधी मिळत नसल्याने शहर विकासापासून वंचित राहत आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचे आतापर्यंत अनेक प्रस्ताव तयार झाले. मात्र, ग्रामीण भागाच्या विरोधामुळे ते बासनात गुंडाळावे लागले. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची चळवळ पुन्हा सक्रिय झाली आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकीची तयारी सुरू आहे. सध्या असलेल्या ८१ प्रभागांचे १०० प्रभाग होतील. तुम्ही डावीकडे बघा, उजवीकडे बघा, मागेही बघा आणि पुढेही बघा. काय होईल हे सांगता येत नाही. वार्ड रचना परत होणार असल्याने नवीन प्रभाग रचनेते १०० वार्ड होतील, असेही पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT