Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत होत असताना तिसरी आणि चौथ्या आघाडीचा पर्याय पुढे आला आहे. वंचित बहुजन आघाडी आम आदमी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांची तिसरी तर रिपब्लिकन पार्टी (RPI) आणि जनसुराज्य शक्ती ही चौथी आघाडी अशी चौरंगी लढत असणार आहे असणार आहे.
मात्र प्रमुख महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत होत असताना अपक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. तब्बल 379 अपक्ष या निवडणुकीच्या रणांगणात असणार आहेत. 4 जानेवारीला चिन्ह वाटप होणार असल्याने केवळ दहा दिवसच या अपक्षांना चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी मिळणार आहेत.
बहुसदस्य प्रभागरचनेत 370 हून अधिक अपक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. 2 जानेवारीपर्यंत अर्ज माघारीची मुदत असल्याने किती अपक्ष रणांगणात असणार हे चित्र रविवार पर्यंत स्पष्ट होणार आहे. त्यानंतर 4 जानेवारी रोजी या अपक्षांना चिन्ह वाटप होणार आहे. तर 15 जानेवारीला मतदान होणार असून 13 तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रचार असणार आहे.
त्यामुळे केवळ नऊ दिवसच अपक्षांना चिन्ह प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवावे लागणार आहे. शहरातील सुमारे सहा हजार उंबरठ्यांपर्यंत पोहोचणे आता राजकीय पक्षांनाही अशक्य होत आहे. तेथे अपक्ष उमेदवारांची डाळ कशी शिजणार, अशी अवस्था झाली आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच कोल्हापुरात बहुसदस्य प्रभागावर निवडणूक होत आहे. याचदरम्यान प्रभागाची रचना बदलली आहे. भौगोलिकदृष्ट्या प्रभागाची लांबी-रुंदीही वाढली आहे. टेंबलाईवाडीपासून ते राजेंद्रनगरपर्यंत प्रभागाचे भौगोलिक क्षेत्र एका-एका प्रभागाचे आहे. एका प्रभागात साधारण वीस ते तीस हजारांपर्यंत मतदारांची संख्या आहे. या सर्वांना केवळ चौदा दिवसांत मतदारांच्या दारापर्यंत जायचे आहे.
मतदारांना अपक्ष उमेदवाराचे चिन्ह पोहोचवायचे आहे. यासाठी अपक्ष म्हणून लागणारी ताकद फारच कमी असल्याचे दिसते. उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेकांची तारांबळ उडाली. राजकीय पक्षांकडे असलेल्या कार्यकर्त्यांचा उपयोग अशा कामासाठी झाला. मात्र, अपक्षांना प्रत्येक टप्प्यावर कसरत करावी लागत आहे. एकीकडे राजकीय पक्षांनी उमेदवारी दिलेली नाही म्हणून काहींनी नाराज होऊन अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
काहींनी इतरांची मते कमी करण्यासाठी, तर काहींनी लोकशाहीने हक्क दिला आहे म्हणून रिंगणात उतरले आहेत. एकदा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. यामध्ये रोज खर्चाचा हिशेब देणे, तो कोठे केला याची माहिती देणे, माहिती पत्रक प्रसिद्ध करणे, मतदारांपर्यंत पोहोचविणे, यासाठी आवश्यक इंधन, इतर खर्चाचा हिशेब पाहता अपक्षांना ही निवडणूक साधारण लाखांत जाणार आहे. अपक्ष उमेदवारांसमोर मतदारांसमोर पोहोचणे, त्यांच्यापर्यंत आपले नाव आणि चिन्ह पोहोचविण्याचे एक आव्हान उभे राहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.