Kolhapur News, 31 Dec : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार खऱ्या अर्थाने तापायला सुरुवात झाला आहे. अशातच काँग्रेसकडून कोल्हापूर महानगरपालिका जिंकण्यासाठी नव्या टॅगलाईनची घोषणा करण्यात आली. या अगोदर 'आमचं ठरलंय', या घोषणेवर कोल्हापूर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काँग्रेसने आपल्या ताब्यात घेतली होती.
तर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर 'कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं' ही टॅगलाईन आणत प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र आता त्याला महायुतीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आला आहे. काँग्रेसकडून कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 'कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं' हे घोषवाक्य घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहे.
या माध्यमातून काँग्रेसचा जाहीरनामा तयार करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. मात्र या टॅगलाईनवर सुरुवातीपासूनच महायुतीतील प्रमुख नेत्यांनी आरोपाच्या फेऱ्या झाडल्या होत्या. शिवाय काँग्रेसकडून याचे त्यातील विविध चौकात फलकांच्या माध्यमातून प्रसिद्धी केली होती. आता या टॅगलाईनला महायुतीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
गेल्या दहा वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिकेवर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. हा धागा पकडून आता महायुतीकडून 'सत्ता असताना भरलं खिसं, आता म्हणताय कोल्हापूर कसं' अशा शब्दात काँग्रेसच्या या टॅगलाईनला प्रतिउत्तर दिलं आहे. शहरातील विविध ठिकाणी हे फलक लावण्यात आले आहेत.
दरम्यान, धनंजय महाडिक यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटलं की, 'विरोधकांनी घोषणा केली, कोल्हापुर कसं तुम्ही म्हणशीला तसं, प्रत्येक वेळी टॅगलाइन लाऊन कोल्हापूरकरांना फसवायचं ठरवले आहे. कोल्हापूर कसं थेट पाईप लाइन पाण्याची बोंब झाली तसं. कोल्हापूर कसं रस्ते खड्ड्यात गेले तसे. कोल्हापूर कसं आय टी पार्क बोंब उडाली तसे. आता याला लोक विचारत घेणार नाही.'
काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या इलेक्शन कॅम्पेन टॅगलाईन वर आम आदमी पार्टीने सडकून टीका केली होती. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, पण यापूर्वी सत्तेत तुम्हीच होता. सातत्याने काँग्रेस सत्तेवरच आहे, इतके वर्षे सत्तेत होता. तुम्ही काही करू शकला नाही. तुम्ही टक्केवारी थांबू शकला नाही, लोकांचे प्रश्न सोडवू शकला नाही. तुम्ही जर ही टॅगलाईन देत असाल तर आता कोल्हापूर कसं, घरात बसा असं होईल, अशा शब्दात संदीप देसाई यांनी टीका केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.