Kolhapur News: शेवटपर्यंत महाविकास आघाडीमध्ये स्थान मिळवू पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अखेर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. काल (शुक्रवारी) सायंकाळपर्यंत काँग्रेसला अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र काँग्रेसकडून कोणीच संपर्क केला नसल्याने तिसरी आघाडी करण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने घेण्यात आला.
आज आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी सोबत समाधानकारक चर्चा झाल्याने उद्या राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार यावर शिक्का मोर्तब होणार आहे. शिवाय 50 लाख घेऊन या आणि मगच उमेदवारी मागा, असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी करत काँग्रेससह इतर पक्षांवर लेटर बॉम्ब टाकला आहे.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026 महाविकास आघाडीचा तिढा अजूनही सुटण्याच्या मार्गावर नाही त्यामुळे आम आदमी पार्टी व वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक झाली.
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या अयोध्या टॉवर या ठिकाणी बैठक झाली. बैठकीला वंचित महानगराध्यक्ष अरुण सोनवणे व आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांच्याबरोबर 81 जागांबाबत सविस्तर चर्चा झाली. इतर काही घटक पक्ष देखील आघाडीमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यांचं सुद्धा काही जागेवर स्वागत केलं जाईल, असे शेवटी व्ही. बी. पाटील यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडी व आम आदमी पार्टी पक्षाबरोबर अतिशय सविस्तर चर्चा झाली. इंडिया आघाडीतील इतर घटक पक्ष सुद्धा छोटे-मोठे आमच्याबरोबर येण्यास इच्छुक आहेत. त्यांनाही सोबत घेतलं जाईल, असे बैठकी ठरले. बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार व प्रदेश निरीक्षक व राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे कार्याध्यक्ष अनिल घाटगे हजर होते. उद्या सविस्तर अधिकची चर्चा होऊन आघाडीवर शिक्कामोर्तब होईल, असे सर्वानुमते ठरवण्यात आले, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे पदाधिकारी अनिल घाटगे यांनी स्वतंत्र परिपत्रक काढत काँग्रेस सह सर्वच पक्षांवर लेटर बॉम्ब टाकला आहे. काही पक्षांनी सामान्य कार्यकत्यांच्या तोंडातला घास काढून स्वतःच्या मुलांना, धनदांडयांना, दोन नंबर वाल्यांना, देण्याचे जवळ जवळ निश्चत केले आहे. यामुळे कार्यकर्त्याचा स्वाभिमान कमालीचा दुखावला आहे. हीच योग्य वेळ आहे. कार्यकर्त्यांनी आपली सदविवेक बुद्धी जागी ठेवून नेत्यांना जागा दाखवून देण्याची 'अभी नही तो कभी नही" जागे व्हा,व अन्यायाविरुद्ध पेटून उठा. असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यकत्यांनो लढा सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे. पैसा है सर्वस्व नाही हे दाखवून द्या स्वाभिमानाची लढाई लढू या. पैशाचं स्तोम फक्त कोल्हाप्रातांच आहे. जो तो नेता म्हणतो पन्नास लाख घेऊन या आणि "मगच तिकीट मागा" मग सामान्य कार्यकत्यांनी काय फक्त सतरंज्याच उचलायच्या ? याचा जाब विचारण्याची हीच खरी वेळ आहे. चला एक होऊया तिसरा पर्याय निर्माण करुया, तर मग चला आपलंही ठरवूया! निष्ठावान्र कार्यकर्ता ठरवेल तसं घडवूया! असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.