PMC Nivadnuk : पुण्यात महाविकास आघाडीचे जागा वाटप फायनल : शरद पवार, मनसेसह सर्वच पक्षांचं एकमत

Pune Mahapalika Nivadnuk : अनेक दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरुन खलबतं सुरु होती. आज जागा वाटपाच्या फॉर्म्युला ठरल्यामुळे इच्छुकांचा जीव भाड्यात पडला आहे.
Pune MVA Seat Sharing Final: MNS to Get Seat from Thackeray Sena Quota
Pune MVA Seat Sharing Final: MNS to Get Seat from Thackeray Sena QuotaSarkarnama
Published on
Updated on

PMC Election News : दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची चर्चा संपुष्टात आल्यानंतर पुण्यात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही प्रमुख पक्षांचे जागा वाटपावर एकमत झाल्याची माहिती शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकर पक्षाच्या वाट्याला आलेल्या जागांमधून मनसेला जागा मिळणार असल्याचा निर्णय झाला आहे.

अंकुश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे प्रमुख पक्ष प्रत्येकी 50 जागांवर निवडणूक लढणार आहेत. तर आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पार्टी यांना 12 ते 15 जागा मिळाल्या आहेत. शनिवारी दुपारी प्रभाग निश्चितीसाठी बैठक होणार आहे.

मागील अनेक दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरुन खलबतं सुरु होती. अखेर जागा वाटपाच्या फॉर्म्युला ठरल्यामुळे इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे. आता उमेदवारी अर्जासाठी कागदपत्राची जुळवाजुळवी सुरु आहे. येत्या दोन दिवसात बहुसंख्य उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.

Pune MVA Seat Sharing Final: MNS to Get Seat from Thackeray Sena Quota
PMC Election 2025: 50 टक्के जागांचा तिढा सुटेना! मुख्यमंत्र्यांची बैठकही निष्फळ, उमेदवार निवड प्रक्रियेवर नाराजी

महाविकास आघाडी जागा वाटप

  • काँग्रेस - 50 जागा

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार - 50 जागा

  • शिवसेना (उबाठा) + मनसे - 50 जागा

  • आप, वंचित, रासप - 12 ते 15 जागा

दुसरीकडे पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात सुरू जागा वाटपाच्या चर्चा काल फिसकटली. स्थानिक नेत्यांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोजक्याच जागा देण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यामुळे ही युती फिस्कटली होती. पण आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठीच अजित पवार मैदानात उतरले आहेत.

आज (शनिवारी) सकाळी त्यांनी अमोल कोल्हे यांच्यासोबत चर्चा केली होती.वरिष्ठ नेत्यांसोबत अजितदादा चर्चा करीत आहेत. अमोल कोल्हेसोबत चर्चेनंतर पुण्यातील प्रमुख राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक अजित पवारांनी रद्द केली. पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रबाबत अमोल कोल्हेशी चर्चा केल्यानंतर पुण्यातील स्थनिक नेत्यांनी चर्चा थांबवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com