Chandrakant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil : 'पाईपलाईनचे पैसे थेट बावड्याच्या घरात...', चंद्रकांत पाटलांनी वादाला तोंड फोडलं

Kolhapur Municipal Election : महायुतीच्या प्रचार शुभारंभात बोलताना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट वादालाच तोंड फोडले आहे. सकाळच्या क्षेत्रात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी पंचनामा जाहीर करत असताना महायुतीवर विकासाच्या मुद्द्यांवरून घेरले. तर सायंकाळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट पाईपलाईनचा मुद्दा काढत पलटवार केला.

Rahul Gadkar

Kolhapur News, 04 Jan : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी अर्ज माघारीचा दिवस संपल्यानंतर शहरातील प्रभागातील अंतिम लढत निश्चित झाली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी प्रत्यक्ष लढाई होत असताना प्रचाराच्या पहिल्याच दिवशी आरोप प्रत्यारोपाने कोल्हापूर महानगरपालिकेचे रणशिंग फुंकले आहे.

महायुतीच्या प्रचार शुभारंभात बोलताना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट वादालाच तोंड फोडले आहे. सकाळच्या क्षेत्रात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी पंचनामा जाहीर करत असताना महायुतीवर विकासाच्या मुद्द्यांवरून घेरले. तर सायंकाळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट पाईपलाईनचा मुद्दा काढत पलटवार केला.

कोल्हापूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी थेट पाईपलाईन आणली. पण या थेट पाईपलाईनच्या योजनेचे पैसे थेट बावड्याच्या घरात गेले. काही ठिकाणी छिद्रे पडली. पण लोकांना अजून पाणी मिळालेलं नाही अशी घनाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. काल मिरजकर तिकटी येथे झालेल्या महायुतीच्या प्रचार शुभारंभात ते बोलत होते.

कधी आघाडी म्हणून तर कधी पक्ष म्हणून महानगरपालिकेच्या राजकारणात तुम्ही 15 वर्षे सत्तेत होता. इतकी वर्ष सत्तेत असताना तुम्ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर विकास कामाबद्दल बोलत आहात. इतके वर्ष तुम्ही झोपा काढत होता काय? असा सवाल मंत्री पाटील यांनी केला.

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी देखील काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. विकास कामाच्या नावाखाली अनेक वर्ष त्यांनी थापा मारल्या. केवळ आपले हॉस्पिटल, आपले कॉलेज, आपले हॉटेल कसे चांगले चालेल? याच्याकडे लक्ष दिले. महानगरपालिकेच्या जागा कशा धापायच्या हेच त्यांनी बघितले. पण आता जनतेला येड्यात काढण्याचे दिवस संपले आहेत. असे आमदार क्षीरसागर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT