Congress Support Thackeray : वंचित-काँग्रेसची थेट ठाकरे बंधूंना मदत, नव्या रणनीतीमुळे भाजप टेन्शनमध्ये

Uddhav Thackeray BMC Congress Congress–Vanchit Alliance : काँग्रेस वंचित बहुजन विकास आघाडीची युती झाली आहे. मात्र, मुंबईत काँग्रेसच्या नव्या रणनीतीमुळे थेट ठाकरेंना फायदा होणार असल्याचे चित्र आहे.
Congress Uddhav Thackeray Shivsena  (1).jpg
Congress Uddhav Thackeray Shivsena (1).jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. ही युती ठाकरे बंधूंसाठी डोकेदुखी वाढवणारी ठरेल अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेसच्या नव्या रणनीतीमुळे ठाकरे बंधूंना मोठी मदत होणार असल्याचे चित्र आहे.

काँग्रेसने वंचितला 62 जागा दिल्या होत्या. मात्र, वंचितने त्यातील 21 जागा काँग्रेसला परत केल्या. यातील पाच जागांवर काँग्रेसने उमेदवार दिले. मात्र, 16 जागांवर काँग्रेस आणि वंचितचा उमेदवार नाही. त्याचा थेट फायदा भाजपला होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

काँग्रेस या बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून त्या 16 जागांवर ठाकरे बंधूंना पाठींब्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना काँग्रेस या ठिकाणी पाठींबा देणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. काँग्रेसच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

दहिसर, बोरीवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, वांद्रे, सायन, कुर्ला, मानखुर्द येथे काँग्रेसची पारंपरिक मतं आहेत. मात्र, या जागांवर काँग्रेसने वंचितला सोडल्या वंचितने त्या जागा परत केल्या त्यामुळे काँग्रेसने थेट आता येथे ठाकरेंना पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. भाजप उमेदवाराला फायदा होऊ नये आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा मेसेज जाऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

दलित-मुस्लिम मतांचा फायदा

16 प्रभागात काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार नसल्याने दलित-मुस्लिम मतदार कोणाला पाठींबा देणार अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेसने थेट ठाकरेंना मदत केल्यास ही मते ठाकरेंकडे वळणार आहेत. त्यामुळे ठाकरेंना या प्रभागात बुस्टर मिळणार आहे. तसेच या 16 जागांमुळे ठाकरे सत्तेच्या आणखी जवळ जातील, अशी देखील चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com