ShivSena (UBT) and Congress leaders during alliance discussions in Kolhapur as internal dissent grows over unresolved seat-sharing decisions ahead of the municipal corporation elections. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Mahapalika : महाविकास आघाडी व्हेंटिलेटरवर! राष्ट्रवादीनंतर ठाकरेंची शिवसेनाही वेगळ्या निर्णयाच्या तयारीत; स्वतंत्र लढतीचा प्रस्ताव तयार

Kolhapur politics : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडीतील जागावाटप न ठरल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी वाढली असून स्वतंत्र लढतीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे गेला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही जागावाटपाच्या मुद्द्यावरून स्वतंत्र लढण्याच्या विचारापर्यंंत आला आहे. कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आघाडीची घोषणा होऊन देखील जागा वाटपासंदर्भात शिवसैनिकांमध्ये धुसफूस सुरू आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 12 जागा आणि एक स्वीकृत नगरसेवक पदाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आघाडीची घोषणा केली होती. परंतु याला 2 दिवस उलटताच शिवसैनिकांमधील रोष बाहेर येत आहे. त्यामुळे स्वतंत्र लढतीचा प्रस्ताव काही पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांपुढे ठेवला आहे. शिवाय काँग्रेसने 48 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर शिवसैनिकांचे टेन्शन आणखीन वाढले आहे. दरम्यान वरिष्ठ नेत्यांच स्वतंत्र लढण्याच्या प्रस्तावावर विचार मंथन होणार आहे. त्यानंतरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पुढील भूमिका ठरणार असे प्राथमिक चित्र दिसत आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काँग्रेससोबत आघाडी झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. शहरातील अनेक मतदारसंघातून काही इच्छुकांनी आपल्या उमेदवारीची मागणी ठाकरे सेनेकडे केली होती. काँग्रेस सोबत आघाडी करूनही आपल्याला समानधारक जागा मिळत नसल्याने काही इच्छुक पदाधिकाऱ्यांनी थेट वरिष्ठांकडे मैत्रीपूर्ण किंवा पक्ष लढतीचा प्रस्ताव ठेवला आहे. सध्या ठाकरेंच्या सेनेकडून 7 जागांवर एकमत झाल्याने आणखीन 5 जागांवर उमेदवारांबाबत चर्चा का होत नाही? असा सवाल करत काही शिवसैनिकांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील धारेवर धरली आहे.

शिवसैनिकांचा सूर स्वतंत्र लढण्याचा आहे. जय हो अगर पराजय होवो अशा मानसिकतेत शिवसैनिक आहे. दरम्यान काल काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर ठाकरे सेनेच्या संभाव्य उमेदवारांना वगळून ही यादी जाहीर करण्यात आली. ठाकरे सेनेचे (shivsena) उमेदवार हे सामनातून जाहीर होणार आहेत. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तीन दिवस शिल्लक असताना पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच उमेदवारीपासून डावलेले जात आहे. त्यामुळे यापूर्वीच त्यांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे.

आघाडीचे हादरे प्रभाग क्र. 10 मधून

जिल्हाप्रमुख रविकरण इंगोले यांच्या पत्नी तेजस्विनी इंगवले आणि पुतणे राहुल इंगवले यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडे प्रस्ताव ठेवला आहे. मात्र काँग्रेसकडून अक्षय जरग यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या वादातच काँग्रेस कडून या मतदार संघातील उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. इंगवले यांची एक उमेदवारी डावलली तर आघाडी तुटली तर हे त्याचे प्रमुख कारण असू शकते.

6 जण अपक्ष लढण्याच्या तयारीत

स्वतंत्र लढण्याचा निर्धार असो वा आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय असो, ठाकरे सेनेचे काही पदाधिकारी कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आघाडीतून उमेदवारी मिळाल्यास हे सहा पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात असू शकतात. मात्र काँग्रेस (Congress) कडून केवळ सातच जागांचा विचार झाला तर ठाकरेंचे शिवसैनिक बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

यामध्ये शहर प्रमुख राजू पाटील, शहर उपप्रमुख राहुल माळी, महिला जिल्हा उपाध्यक्ष स्मिता सावंत, शशिकांत बिडकर यासह अन्य दोघे जण अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. सुरुवातीपासूनच यांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे. पण प्राथमिक स्तरावर त्यांनी आघाडीतून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. मात्र ही मागणी मान्य झाल्यास अपक्ष लढण्याची तयारी ठेवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT