Hasan Mushriff, Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : कोल्हापूरचं राजकारण बोटावर फिरवणारी 'मैत्री' तुटली! मुश्रीफांकडून मोठी घोषणा; म्हणाले,'सतेज पाटील अन् आमच्यातील...'

Kolhapur Municipal Election : कोल्हापूर महापालिका निवडणुकीपूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांच्याशी आघाडी नसल्याचे स्पष्ट करत राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.

Rahul Gadkar

Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्ह्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या मैत्रीचा धागा सर्वश्रुत आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात सध्या महायुती म्हणून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामोरे जाणार आहे. मात्र, जागा वाटपामध्ये राष्ट्रवादीला समानधारक जागा मिळत नसल्याने कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची आघाडी होईल. असा अंदाज कार्यकर्त्यांकडून बांधला जात होता. मात्र, त्या चर्चेला आता मंत्री मुश्रीफ यांनीच पूर्णविराम दिला आहे.

लोकांचा काँग्रेस पक्षावर किती विश्वास राहिला आहे हे प्रज्ञा सातव यांच्या वरून कळते आहे. पाच वर्षे कार्यकाळ असूनही त्यांनी राजीनामा दिला. विरोधी पक्षनेते पदाचे संख्याबळ कमी करण्याचा प्रयत्न होता. असे मी आज वाचले. माझे मित्र गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते पदाची आस लावून बसले होते. पण बिचाऱ्याचं दुर्दैव आहे. असं म्हणत मंत्री मुश्रीफ यांनी आगामी महापालिका निवडणुकीत संभाव्य आघाडी होईल? यावर बोलताना म्हणाले, सतेज पाटील आणि आमच्यातील दोरी तुटलेली आहे. असे स्पष्ट केले आहे.

महायुती म्हणून जागा किती मिळतील यावर अजून चर्चा नाही. पण 20- 25 वर्षे राष्ट्रवादी सत्तेत आहे. माझ्याकडे प्रत्येकी डझनभर महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती आहेत. त्यामुळे या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादीला 25 जागा मिळाव्यात. समानधारक जागा न मिळाल्यास वेळ आल्यावर ठरवू असा इशारा मंत्री मुश्रीफ यांनी दिला.

इचलकरंजी महामालिकेच्या महायुतीतील जागा वाटपा संदर्भात बोलताना, काल प्राथमिक चर्चा झाली आहे. आज भाजपकडून काय करू शकतो यावर चर्चा होणार आहे. त्यानंतर निर्णय घेणार. इचलकरंजी मध्ये एक तृतीयांश जागा आम्ही मागितले आहेत. शिवाय काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संदर्भात देखील आघाडी करण्याचा निर्णय नगरपालिकेप्रमाणे होऊ शकतो. असे मुश्रीफ म्हणाले.

राष्ट्रवादी बाबत हे घडले, हे दुर्दैवी आहे. यापूर्वी धनंजय मुंडे त्यांच्याबाबत जी घटना घडली त्यात ते दोषी आणि आरोपी नव्हते. पण त्यावेळी एक वातावरण झाले. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता कोकाटे यांची घटना आहे. ती राष्ट्रवादी (NCP) मध्ये येण्यापूर्वी 1985 ची घटना आहे. पण कायद्यापुढे कोणीही मोठा नाही, उच्च न्यायालयात त्याला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. पार्थ पवार यांना पुण्यातील प्रकरणात गोवणे, हे षडयंत्र आहे की काय? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचा पक्ष आहे. तो जनतेचा मनावर अधिराज्य करतोय. राष्ट्रवादी काँग्रेसला कोणीही टार्गेट करू शकत नाही, असेही मुश्रीफ म्हणाले.

पहिले प्राथमिक बैठक झाली त्यावेळी जनसुराज्य शक्तीचे कोणीही उपस्थित नव्हते. मात्र आता त्यांची इच्छा झालेली दिसते. आजचे बैठकीला येतात का ते पाहूया. आमचा मोठा भाऊ भाजप (BJP) आहे. त्यांनी त्यांना निमंत्रण द्यायला हवे. त्यांच्या ते पोटात आहेत. असा खोचक टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT