A tense political discussion unfolds during a press meet as leaders highlight the Jayprabha Studio controversy, a key issue shaping Kolhapur election dynamics. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : जयप्रभा स्टुडिओचं प्रकरण पुन्हा तापणार, आमदार राजेश क्षीरसागरांच्या महापालिकेतील बैठकींचं गौडबंगाल लाटकरांनी केलं उघड

Jayprabha Studio Controversy : 'महापालिकेत बैठक घ्यायची एका कारणासाठी आणि काम करायचे दुसरे, अशी पद्धत सुरू आहे. यावेळी अधिकारी काम करत नाहीत. चुकीची कामे केली जात आहे. पोट फुटेपर्यंत खायला लागले आहेत, अजून किती खाणार असा दम दिला जात आहे. यातून विकासकामे नाही तर अधिकाऱ्यांना जयप्रभा स्टुडिओला टीडीआर देण्यास भाग पाडले जात आहे.'

Rahul Gadkar

Kolhapur News, 04 Dec : आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जयप्रकाश स्टुडिओचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर सातत्याने जयप्रभा स्टुडिओ लाटत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून याबाबतचे आरोप शांत झाले असताना पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठकांचा सपाटा लावला आहे.

मात्र या बैठक घेण्यामागचं कारण माजी स्थायी समिती सभापती आणि विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी आरोप करत पुढे आणले आहे. महापालिकेत अधिकारी पोट फुटेपर्यंत खातात. हे बंद झाले पाहिजे. शहराचा विकास झाला पाहिजे, असे दम देऊन आमदार राजेश क्षीरसागरांनी जयप्रभा स्टुडिओला टीडीआर द्या, शासनाच्या अहवालाची पूर्तता करा, म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे.

शासनाकडून आलेला अहवाल चुकीचा आणि मॅनेज केलेला आहे. त्या अहवालानुसार टीडीआर दिला, त्या अधिकाऱ्याला काँग्रेस पक्षातर्फे न्यायालयात खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी आज दिला. जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लाटकर म्हणाले, 'महापालिकेत बैठक घ्यायची एका कारणासाठी आणि काम करायचे दुसरे, अशी पद्धत सुरू आहे.

यावेळी अधिकारी काम करत नाहीत. चुकीची कामे केली जात आहे. पोट फुटेपर्यंत खायला लागले आहेत, अजून किती खाणार असा दम दिला जात आहे. यातून विकासकामे नाही तर अधिकाऱ्यांना जयप्रभा स्टुडिओला टीडीआर देण्यास भाग पाडले जात आहे. जयप्रभा स्टुडिओवर कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही.

त्यामुळे याला टीडीआर देता येत नाही. आयुक्तांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे. क्षीरसागर यांना जयप्रभा स्टुडिओबबत काळजी असेल तर राज्याच्या सांस्कृतिक विभागाला देऊन तो चालवला पाहिजे. चित्रपट महामंडळाला हा स्टुडिओ देण्यासही हरकत नाही. यासाठी आमचे यावर लक्ष आहे. जो-जो अधिकारी या प्रस्तावावर सही करेल त्याला न्यायालयात उत्तर द्यावे लागेल.'

पालकमंत्री आबिटकरांना पुढे करून क्षीरसागरांचा खेळ

जयप्रभा स्टुडिओ घेणाऱ्या कंपनीमध्ये राजेश क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर भागीदार आहे. त्यामुळे हा सगळा खटाटोप सुरू आहे, असाही आरोप लाटकर यांनी केला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना पुढे करून हा सर्व खेळ खेळला जात आहे. क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकत महापालिकेकडे विस्थापितांसाठी म्हणून असणाऱ्या कोट्यवधी रुपयांची जागा आपल्या मुलाच्या कंपनीला मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना सूचना वजा दम दिला असल्याचा आरोपही लाटकर यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT