Congress MLA Satej Patil addressing citizens during campaign interactions in Kolhapur, commenting on Mahayuti seat-sharing issues Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur MahaPalika : भाजप अन् ताराराणी आघाडीचे जुळेना... महाडिक गट स्वतंत्र लढणार! सतेज पाटलांनी फोडली महायुतीतील ब्रेकिंग बातमी

Kolhapur MahaPalika Election : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुतीतील जागा वाटपावर तणाव वाढला असून, आमदार सतेज पाटील यांनी शरद पवार गटाला शुभेच्छा देत राजकीय चर्चा तापवल्या आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur MahaPalika: कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुतीत बेबनाव असल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 7 ते 8 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. शिवसेनेला जास्त जागांची अपेक्षा आहे, त्यांनी पक्षप्रवेश करून घेतल्याने त्यांना तिकीट देता येत नाहीयेत. भाजप आणि महाडिक यांच्या ताराराणी आघाडीचे एकमत झालेले नाही. ताराराणी आघाडी कदाचित स्वतंत्र लढू शकते, अशा चर्चा आम्हाला ऐकायला मिळत असल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे. शनिवारी सकाळी कॅम्पेन निमित्त पहाटेपासून ते नागरिकांच्या भेटीगाठी घेत होते. त्यावेळी ते बोलत होते.

शरदचंद्र पवार पक्ष मविआतून बाहेर :

महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी प्रत्येकाला पक्ष वाढविण्याची मुभा आहे, असे म्हणत शरदचंद्र पवार पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाला 9 जागांची अपेक्षा होती. सिंगल प्रभाग असते तर कदाचित निर्णय झाला असता. चारचा प्रभाग असल्याने सर्वांना विचारात घेतले पाहिजे. यावेळी चार जण असल्याने निर्णय घेणे अडचणीचे वाटते, असे ते म्हणाले.

शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर टीका केली असली तर मी टीका करणार नाही. कारण यापूर्वी त्यांची मला मदत झालेली आहे आणि पुढे त्यांची मला मदत लागू शकते. त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली, त्यांचे उमेदवार विजयी झाले तर पुढे आमच्या सोबत त्यांची आघाडी होऊ शकते. त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत असते की आम्ही निवडणुकीला उभं रहावे. निकालानंतर पुन्हा आघाडी होऊ शकतं असं बऱ्याच ठिकाणी झालेला आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असेही पाटील म्हणाले.

पहिली यादी जाहीर, दुसरी कधी?

काँग्रेसने उमेदवारी जाहीर करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. काल आम्ही 48 उमेदवारांची यादी जाहीर केली. शिवसेनेसोबत जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू आहे. त्यानंतर दुसरी यादी जाहीर करणार असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, हे कॅम्पेन राबवून आम्ही जाहीरनाम्यासाठी लोकांच्याकडून सूचना मागून घेत आहोत.

गेल्या पाच वर्ष महापालिकेवर नगरसेवक नसल्याने आणि प्रशासक असल्याने शहराचा क्रॅश झालेला आहे. कोल्हापूर शहराला खड्डे मुक्त आणि धुरळा मुक्त करायचा असेल तर काँग्रेस हाच पर्याय आहे. प्रशासक काळात शहराची दुरावस्था झाली आहे. त्या संदर्भात लोकांच्या भावना तीव्र आहेत, वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न महत्त्वाचा बनलेला आहे. आम्ही जाहीरनाम्यातून लोकांना विश्वास देणार आहोत, असे सतेज पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT