Kolhapur Politics Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Mahapalika: 'मविआ'त काँग्रेसच मोठा भाऊ; राष्ट्रवादी अन् ठाकरेंच्या शिवसेनेला जागा वाटपात गुंडाळणार?

Kolhapur Politics: कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी होईल असे जवळपास निश्चित झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूला जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ असणार आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ राहणार आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी होईल असे जवळपास निश्चित झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूला जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ असणार आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस (Congress) मोठा भाऊ राहणार आहे.

महापालिकेची सध्याची राजकीय परिस्थिती पहिली तर गतवेळी सर्वाधिक काँग्रेसने जागा घेतल्या होत्या. पण आता राजकीय संदर्भ बदलले आहेत. महाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेसचं महायुतीला टक्कर देऊ शकतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जागा वाटपा संदर्भात काँग्रेस 55 पेक्षा अधिक जागा घेण्याची शक्यता आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून 35 जागांची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी या मुलाखती घेतल्या. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 35 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. कोल्हापूर महापालिकेच्या 35 जागांसाठी आम्ही महाविकास आघाडीत आग्रही आहोत. मात्र, विजयी होणाऱ्या 15-16 जागांवर आमचाच हक्क आम्ही महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सांगणार आहोत. आघाडीच्या नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन याबाबत अंतिम निर्णय होईल’, असे दुधवडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शहरातील वीस मतदारसंघांपैकी जवळपास बारा ते तेरा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना पोषक वातावरण आहे. या जागांवर ठाकरेंच्या सेनेकडून प्रभावीपणे दावा केला जाऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीत सेनेला 13-14 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शहरप्रमुख सुनील मोदी, नियाज खान, महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले आणि त्यांची पत्नी तेजस्विनी इंगवले यांचाही उमेदवारी मागणाऱ्यांमध्ये समावेश होता.

काँग्रेसकडे ओघ, जागावाटपात 55 च्या पुढे जाण्याचा अंदाज

महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्षातून लढवण्यासाठी २० प्रभागांसाठी साडेतीनशे जणांनी नोंदणी केली आहे. पहिल्या टप्प्यात एक ते दहा प्रभागातील 135 इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी मुलाखती दिल्या. तर बुधवारी (ता. 17) उर्वरित 11 ते 20 प्रभागांतील मुलाखती घेतल्या जाणार आहेत. एका-एका प्रभागासाठी चाळीस इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.

माजी नगरसेवकांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये सुभाष बुचडे, अजित पोवार, संदीप नेजदार, माधुरी लाड, स्वाती यवलुजे, माणिक पाटील, राजाराम गायकवाड, अर्जुन माने, प्रकाश पाटील, मंगल चव्हाण, कैलास गौडदाब, जय पटकारे, अफजल पिरजादे, धनंजय सांवत, उमा बनछोडे, श्रीकांत बनछोडे, इंद्रजित बोंद्रे, राहुल माने, प्रताप जाधव, दीपा मगदूम आदी माजी नगरसेवक-नगरसेविका यांनी मुलाखती दिल्या आहेत,

‘काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांचा ओघ आहे. एका-एका प्रभागात 40 लोक उमेदवारी मागत आहेत. महाविकास आणि इंडिया आघाडी या घटक पक्षांच्या जागा वाटपाच्या प्रस्तावावर सर्वजण चर्चा करणार आहोत. त्यामुळे कोणाला किती जागा मिळणार हे गुरुवारी होणाऱ्या बैठकीत निश्चित होणार आहे.

शिवाय आम आदमी पार्टी यांच्याशी आघाडीसाठी चर्चा सुरु आहे. शहरातील काही प्रभागात आम आदमीची स्वतःची ताकद असल्याचा दावा आपचे नेते संदीप देसाई यांनी केला आहे. त्यामुळे आम्हाला समाधान कारक जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा 20 जागांवर दावा

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येक प्रभागात एक जागा मिळावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी केली आहे. त्यामुळे 20 जागांवर दावा केला आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्रवादीला एक अंकी आकड्यावर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT