VBA-Congress: आघाडी की आणखी काही? प्रकाश आंबेडकर अन् हर्षवर्धन सपकाळ यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

VBA-Congress: हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत येऊन भेट घेतली होती. दोघांमधील भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
Sakpal_Ambedkar
Sakpal_Ambedkar
Published on
Updated on

VBA-Congress: समविचारी पक्ष आघाडी न करता वेगवेगळे लढल्यानं मतविभाजन होऊन त्याचा फटका सर्वांना बसतो हे गेल्या काही निवडणुकांमधून काँग्रेसच्याबाबतीत स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये याचा मोठा फटका काँग्रेस पक्षाला म्हणजे एकूणच महाविकास आघाडीला बसला होता. याच एक प्रमुख कारण म्हणजे वंचितची नसलेली साथ. लोकसभेवेळी जागा वाटपावरुन वंचित इंडिया आघाडीत सामिल झाला नाही. तर विधानसभेलाही वंचितची साथ नसल्यानं मविआला काही प्रमाणात का होईना फटका बसला.

Sakpal_Ambedkar
Voter App : मतदान केंद्रावर नाव शोधण्यात वेळ वाया घालवू नका! निवडणुका आयोगानं आणलंय 'हे' खास अॅप

पण आता महापालिका निवडणुकीसाठी वंचित आणि काँग्रेसच्या युतीची चर्चा सुरु झाली आहे. त्याच कारण म्हणजे काल मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत येऊन भेट घेतली होती. या भेटीमध्ये येत्या निवडणुकांमध्ये आघाडीबाबत चर्चा झाल्याचं वृत्त जवळपास सर्वच माध्यमांनी सुत्रांच्या हवाल्यानं दाखवलं. पण आता दोघांमधील भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

Sakpal_Ambedkar
RPI Politics : नेत्यांच्या बेरजेच्या राजकारणाने रिपब्लिकन पक्षाची झाली वजाबाकी, महापालिकेतून नगरसेवक झाले गायब

प्रकाश आंबेडकर आज कोल्हापुरच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील सध्या चर्चेत असलेल्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आंबेडकर म्हणाले, सकपाळ यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, त्यांच्या मुलीच्या इंग्लंडमधील शिक्षणाविषयी आमच्या बैठकीत चर्चा झाली. म्हणजेच भेटीमागील कारणं जरी प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं असलं तरी आगामी मुंबई-पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यानंतर या दोन दिग्गज राजकीय नेत्यांची भेट झाली. त्यामुळं आंबेडकरांनी कारण काहीही सांगितलेलं असोत पण माध्यमांमध्ये वंचित आणि काँग्रेस आघाडीची चर्चा सुरु आहे.

Sakpal_Ambedkar
Ajit Pawar Strategy : बारणेंच्या लेकाविरोधात दादांचा 'मास्टरप्लॅन'! ठाकरेंचा 'तो' बडा मोहरा राष्ट्रवादीच्या गळाला; मावळात नवा ट्विस्ट!

पण तरीही आंबडेकरांनी सकपकाळांसोबतच्या बैठकीचा तपशील हा जाहीर केल्यानंतर या दोन्ही पक्षांची युती होणार की नाही, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण जर ही चर्चा लांबली तर अपक्ष उमेदवारांसोबत काँग्रेसला पुढे जावं लागेल. त्यामुळं तुर्तास तरी वंचित आणि काँग्रेसची आघाडी होईल याबाबत अद्याप संभ्रम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com