AY Patil, Hasan Mushrif, KP Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Politics : कोल्हापूर राष्ट्रवादीत खदखद वाढली; ए. वाय. पाटील यांचे मुश्रीफ यांच्यावर टीकेचे बाण

Rahul Gadkar

Kolhapur Political News :

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत खदखद वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी अखेर खदखद बाहेर काढून पालकमंत्री हसन मुश्रीफ त्यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. तसेच माजी आमदार के. पी. पाटील यांच्यावर निशाणा साधून आपल्याला नेहमी फसवलं, या शब्दांत खदखद व्यक्त केली. पालकमंत्री मुश्रीफ आणि के. पी. पाटील यांनी माझे राजकारण संपवण्याचं काम केलं, अशी टीकाही ए. वाय. पाटील यांनी केली.

राष्ट्रवादीचे प्रदेश (NCP) उपाध्यक्ष ए. वाय. पाटील (AY Patil) यांनी आज सोळांकुर (ता. राधानगरी) येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भूमिका मांडली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवले. राष्ट्रवादी मोठी करण्यासाठी दिवसरात्र राबलो, शेवटी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि माजी आमदार के. पी. पाटील यांनी मला विधानसभा तसेच बिद्री कारखान्याच्या अध्यक्षपदाचा शब्द देत नेहमी फसवलं. माझं राजकारण संपवण्याचं काम केलं. त्यामुळेच राधानगरी भूदरगड तालुक्याच्या विकासासाठी आगामी विधानसभा लढवणार असल्याचं ए. वाय. पाटील यांनी जाहीर केले.

माजी आमदार के. पी. पाटील (KP Patil) यांनी काल स्नेहभोजन आयोजित करून येवले पाटील गटाच्या समर्थकांना आपल्या बाजूनं केलं. या पार्श्वभूमीवर ए.वाय. पाटील गटाचा मेळावा पार पडला. ज्या लोकांसाठी आपण राबलो, त्या लोकांनीच माझ्या पडत्या काळात माझी साथ सोडली याचं दुःख आहे. लोक त्यांना माफ करणार नाहीत. स्वाभिमानी जनतेच्या जिवावरच आगामी विधानसभा निवडणूक मी लढवणार, अशी थेट घोषणाच ए. वाय. पाटील यांनी केली. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'केपीं'चा एवा.य. पाटलांना धक्का

के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील हे मेहुणे पाहुणे आहेत. मात्र, बिद्रीच्या निवडणुकीनंतर त्यांच्यातील वाद प्रकर्षाने बाहेर आला. गुरुवारी के. पी. पाटील यांनी स्नेहभोजनाचे आयोजन करून ए. वाय. पाटलांच्या समर्थकांना निमंत्रण देत त्यांचा पक्ष प्रवेश केला. ए. वाय. पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते गेल्याने ए. वाय. यांना मोठा धक्का मानला जातो.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT