Illegal HSRP Plate 
पश्चिम महाराष्ट्र

HSRP नंबर प्लेटचा काळाबाजार सुरु! वाहनचालकांना पोलिसांनी कारवाईचे संकेत देताच बनावट पाट्या बनवणारी गँग अ‍ॅक्टिव्ह

HSRP : हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) अर्थात सर्व प्रकारच्या वाहनांना बसवण्यात येणारी नव्या नियमानुसारची नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत ३१ डिसेबंर २०२५ रोजी संपली आहे.

Amit Ujagare

HSRP Kolhapur News : हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) अर्थात सर्व प्रकारच्या वाहनांना बसवण्यात येणारी नव्या नियमानुसारची नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत ३१ डिसेबंर २०२५ रोजी संपली आहे. त्यानंतर आता येत्या १५ फेब्रुवारीपासून ज्यांनी या नबंर प्लेट बसवलेल्या नाहीत त्या वाहनचालकांवर राज्यभरातील पोलिसांनी कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळं आता ज्या जुन्या वाहन चालकांनी अद्याप ही नंबर प्लेट बसवलेली नाही त्यांची धावपळ सुरु झाली आहे. पण याचाच याता गैरफायदा घेणारी गँग अॅक्टिव्ह झाल्या आहेत. कोल्हापुरात अशा प्रकारे बनावट HSRP नंबर प्लेट बनवणाऱ्या एका कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला आणि या बनावट नंबर प्लेट ताब्यात घेतल्या. हा नेमका काय प्रकार आहे पाहुयात.

कोल्हापूर जिल्ह्यात बनावट HSRP नंबर प्लेट तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हातकणंगले तालुक्यातील साजणी गावात सुरू असलेल्या या अवैध कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकत तब्बल ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. श्री साई रेडियम आर्ट नावाच्या दुकानात वाहनांवर बसविण्यात येणाऱ्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात HSRP नंबर प्लेटची बनावट निर्मिती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने साजणी गावात छापा टाकला. या कारवाईत नंबर प्लेट तयार करण्यासाठी वापरली जाणारी दोन मशीन, तयार व अर्धवट तयार नंबर प्लेट्स तसेच अन्य साहित्य असा एकूण ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी ३१ वर्षीय संतोष बबन यादव याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट नंबर प्लेटच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्यांना चालना मिळू शकते, त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. पोलिसांकडून या रॅकेटमागील इतर संबंधितांचा शोध सुरू आहे, अशी माहिती कोल्हापूर गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.

दरम्यान, बनावट HSRP नंबर प्लेट तयार करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला असून वाहनधारकांनी अधिकृत केंद्रातूनच नंबर प्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT