Satara ZP : सातारा ZPतील सत्तेबाबत शंभूराज देसाईंचे स्पष्ट संकेत; ‘दोन्ही राष्ट्रवादी अन्‌ शिवसेनेची बेरीज....’

Zilla Parishad Result : सातारा झेडपी निवडणुकीत महायुतीत चुरस रंगली. स्वबळावर लढलेल्या भाजपला निकालात धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडे सत्ता जाण्याची चिन्हे स्पष्ट होत असून शंभूराज देसाई यांनी संकेत दिले.
Satara ZP-Shambhuraj Desai
Satara ZP-Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Satara, 12 February : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्षांमध्ये कमालीची चुरस दिसून आली. भाजपने इतर दोन पक्षांशी युती न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. मात्र निकालानंतर भाजपला मोठी चपराक बसल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेची सूत्रे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे जाण्याची चिन्हे आहेत, तशा हालचालीही होताना दिसून येत आहेत. सातारचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी तर पाटणमधील कार्यक्रमात बोलताना झेडपीवर सत्ता कोणाची येणार, याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ जागांपैकी सर्वाधिक २७ जागा ह्या भाजपने जिंकल्या आहेत. मात्र, सत्तेची सूत्रे शिवसेना (१५ जागा) आणि राष्ट्रवादीच्या (२० जागा) हाती आहेत. त्यातच निवडणुकीपूर्वी भाजप हा स्वबळावर, तर दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आघाडी करून निवडणूक लढवली होती. त्यामुळे निवडणूक आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

निकालानंतर दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यात सत्ता स्थापनेबाबत बैठक झाली. त्या बैठकीत भाजपला वगळून सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा झाली. त्यात पहिल्या अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, तर उपाध्यक्षपद हे शिवसेनेकडे असा फार्म्युल्यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार, असे मानले जात आहे.

दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आभाराच्या सभेत बोलताना भाजप नेत्यांना सूचक इशारा देताना सातारा जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची येणार, याचे स्पष्ट संकेत देसाई यांनी दिले आहेत. त्यामुळे साताऱ्यात भाजपला विरोधी बाकावर बसावे लागण्याची चिन्हे आहेत. पण, देसाई यांनी भाजप काही हातावर हात ठेवून बसलेला नाही, असेही म्हटलेले आहे, त्यामुळे साताऱ्या पडद्याआड काय घडामोडी सुरू आहेत, याची जिल्ह्याला प्रचंड उत्सुकता आहे.

Satara ZP-Shambhuraj Desai
Maharashtra Politic's : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' निर्णयावर राज ठाकरे नाराज; राऊतांनी तातडीने गाठले शिवतीर्थ, दोघांत दीड तास चर्चा

ज्या ज्या मंत्र्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन माझ्यावर टीका केली, त्यांना मी उत्तर देणार नाही. पण, नऊ तारखेला माझ्या मतदारसंघातील जनता नऊ तारखेला उत्तर देईल. देसाई गटाचे लोक शांत आहेत, तोवर शांत असतात. पण देसाई गटाच्या नेत्याची खोड काढली की त्यांची पक्की जिरवायची ताकद या देसाई गटात आहे, हे लक्षात असू द्या.

Satara ZP-Shambhuraj Desai
Government exam fee relief : पालकांसाठी महत्वाची बातमी; सरकारने परीक्षा फी केली माफ, ‘या’ विद्यार्थ्यांना होणार फायदा...

सातारा जिल्हा परिषदेत भाजपची काय अवस्था झाली हो. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना ही जर एका बाजूला केली आणि दुसऱ्या बाजूला भाजप केली तर बेरीज कुठे जाते बघा. अति तिथं माती. अती केल्यानंतर लोकसुद्धा योग्य संधी वाट पाहत असतात, असे सांगून शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणाचे स्पष्ट संकेत दिल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com