Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर स्वीकृत संचालक यांच्या निवडीवरून राजकारण घडून येताना दिसत होते. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची नियुक्ती आता कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुरलीधर जाधव यांची तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने त्यांची या केलेली नियुक्ती वैध असल्याचा निर्णय आज उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे जाधव यांना मोठा दिलासा मिळाला असून, शिंदे फडणवीस सरकारला मात्र हा मोठा झटका मानण्यात येतो.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर राज्यात सत्तापालट झाले व शिंदे - फडणवीसांचे सरकार राज्यात अस्तित्वात आले. यानंतर राजकीय हेतूने प्रेरित जाधव यांची गोकुळ दूध संघा स्वीकृत संचालक पदाची नियुक्ती शिंदे -फडणवीस सरकारने तोरद्द केला,असा आरोप त्याच्यावर करण्यात आला. राज्य सरकारच्या या कारवाईला जाधव यांनी थेट उच्च न्यायावयात आव्हान दिले. या बाबतीत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. एच. श्रीराम व राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होत होती. याप्रकरणी आता न्यायालयाचा निर्णय आला आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना ९ जुलै २०२१ रोजी जाधव यांची शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. दूध संघाच्या संचालक मंडळांच्या काही बैठकीत त्यांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान, मधल्या काळात राज्यात सत्तांतर घडून आले. अन् शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाले. नव्या सरकारकडून सप्टेंबर २०२२ मध्ये आदेश काढून जाधव यांची नियुक्ती रद्द केली होती.शासनाच्या या निर्णयाविरोधात जाधव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिका दाखल करत आव्हान दिले होते. या प्रकरणी वेळोवेळी सुनावणी होत होती. आज न्यायालयाने ठाकरे सरकारने केलेली नियु्क्ती वैध असल्याचा निर्वाळा केला.
गोकुळकडून नियुक्तीसाठी तीन महिन्यांचा विलंब :
शासन नियुक्त प्रतिनिधी असूनही जाधव यांचा गोकुळमध्य सहजासहजी प्रवेश झाला नव्हता. यावेळी त्यांनी आंदोलन करून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केले होते. शासन नियुक्त केलेल्या प्रतिनिधीला ठराव संमत करून तो सरकारकडे द्यावा लागतो. मात्र गोकूळच्या व्यवस्थापनाकडून यासाठी तब्बल तीन महिने विलंब केला गेला. यात राजकारण होत असल्याचे जाधवांनी म्हंटले. विलंब झाल्याने मुरलीधर जाधव यांनी आंदोलन पुकारले होते.
काही काळापूर्वीच जाधव यांच्यासह आणखी दोन स्वीकृत सदस्यांना शासनाने नियुक्ती दिली होती. युवराज पाटील व विजयसिंह मोरे यांची नियुक्ती झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुरलीधर जाधव यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले होते. यामुळे गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंचे आदेश मानावे लागले. यामुळे मुरलीधर जाधव यांचा गोकुळमध्ये प्रवेश झाला. मात्र सरकारबदलल्या नंतर परिस्थिती बदलली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.