दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : जनतेने शिवसेनेवर (Shivsena) कायम विश्वास दाखविला आहे. हा विश्वास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही आहे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उभ्या असलेल्या कौरवांनी त्यांना पाडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच झेंडा कायम फडकणार आहे. ही ताकद शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. नारायण राणेंना (Narayan Rane)आतंकवाद, भस्मासूर म्हणून हिणवणारे आणि आता राणेंची लाचारी पत्करीत असलेले दीपक केसरकर (Deepak Kesarkar) नावाचे भूत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला दिशा ती काय देणार, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी शालेय मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केली. (MP Vinayak Raut criticizes Deepak Kesarkar)
येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित ग्रामपंचायत नावनिर्वाचित सरपंच, सदस्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी संपर्क प्रमुख शैलेश परब, दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस, उपतालुका प्रमुख मिलिंद नाईक, युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे, मुंबई नगरपालिका माजी नगरसेविका शिवानी परब, कसई दोडामार्ग माजी नगराध्यक्ष लीना कुबल, नगरसेवक चंदन गावकर, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळा गावडे, शाखा प्रमुख संतोष मोर्ये, संदेश राणे, संदीप धरणे, केशव धाऊस्कर, ओंकार कुलकर्णी आदी उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, ‘‘दीपक केसरकर हे खुर्चीसाठी लाचारी पत्करणारे आमदार आहेत. पन्नास खोक्यांसाठी त्यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची चाकरी पत्करली. भाजप पक्ष त्यांना नेस्तनाबूत करायला निघाला, तरीही ते भाजपचीच तळी उचलून धरीत आहेत. आजपर्यंत त्यांनी नारायण राणेंना दहशतवाद म्हणून हिणवले. राणेंच्या मुलांनी केसरकर यांच्यावर टीका केली आणि आता तेच केसरकर राणेंचा प्रचार करणार आहेत. गेली १५ वर्षे ज्यांनी लोकांना विकासाच्या आशेवर ठेवून केवळ खुर्ची राखली, ते यापुढे जिल्ह्याचा विकास काय करणार, याचा विचार जनतेने करावा.’’
उद्धव ठाकरेंच्या आमदार निधीतून विकास कामाला पैसे देऊ
थेट निवडून आलेल्या सरपंचांनी आपल्या पदाशी प्रामाणिक राहून गावाचा विकास साधावा. जनतेने ठेवलेला विश्वास असा सार्थकी लावा की पुढच्या निवडणुकीच्या वेळी बिनविरोध तुमची निवड केली जाईल. विकास कामांसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. उद्धव ठाकरे यांच्या स्वनिधीतून दोडामार्ग तालुक्यासाठी कोटींचा निधी देऊ, असे या वेळी खासदार राऊत यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.