छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना मारण्याची धमकी दिल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेला प्रशांत कोरटकर (Prashant Kortakar) यांची अडचण आणखी वाढली आहे.
न्यायालयात दाखल असलेल्या अर्जात इतिहास संशोधक सावंत यांच्याबाबत चुकीची आणि खोटी माहिती दिल्याचं सांगत इंद्रजीत सावंत यांच्याकडून नुकसानीची कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे कोरटकरच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
विविध न्यायालयात प्रशांत कोरटकरने दाखल केलेल्या जामीन अर्जात इतिहास अभ्यासक इंद्रजित यांनी अनेकदा स्वतःच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला. इंद्रजित सावंत यांच्यावरच सामाजिक तेढ निर्माण करण्याबाबतचे गुन्हे नोंद आहेत. त्यांना अटक झाली होती. त्याबाबतची माहिती कोरटकर यांच्याकडून न्यायालयात देखील देण्यात आली होती.
इंद्रजीत सावंत यांची बदनामी करण्यात येत असल्याचा आक्षेप त्यांनी न्यायालयात केल्यावर प्रशांत कोरटकरतर्फे ते परिच्छेद रद्द करीत असल्याचे न्यायालयासमोर लेखी स्वरूपात सांगण्यात आले होते. पण ॲड. योगेश सावंत यांनी स्वतः कोल्हापूर कारागृहात जाऊन इंद्रजित सावंत यांच्यातर्फे आरोपी प्रशांत कोरटकर याला अब्रुनुकसानीची नोटीस काराग्रह प्रशासनाकडून अविनाश भोई यांच्या हस्ते देण्यात आली.
कोरडकर च्या जामीन अर्जावर आज सुनावणी प्रशांत कोरटकरने जामीन मेळावा यासाठी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात कपिल अर्ज केला होता. मात्र शुक्रवारी होणारी सुनावणी आज घेतली जाणार आहे. न्यायालयाकडून आज कोरडकरच्या जामीनावर युक्तिवाद आणि सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरकारी वकील ॲड. सरोदे देखील या सुनावणीला हजर राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.