uddhav thackeray | eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Election : महायुतीचा कोल्हापुरातून तर ठाकरेसेनेचा राधानगरीतून प्रचाराचा नारळ फुटणार

Mahayuti Campaign Kolhapur: करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या प्रचारार्थ तपोवन मैदान येथे 5 नोव्हेंबर रोजी महामेळाव्याचा आयोजन करण्यात आले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 04 Nov : दिवाळीची धामधूम संपल्यानंतर राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. सोमवार हा अर्ज माघारीचा दिवस असल्याने आजपासून खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या धामधुमीला सर्वच पक्षांना सामोरे जावे लागणार आहे.

प्ररच, बैठकांचा जोर आणि सभांचा धडाका यावरच राजकीय पक्षांचे भवितव्य ठरणार आहे. अशातच महायुती राज्यातील प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातून (Kolhapur) करणार आहे. कोल्हापुरातील मेरीवेदर ग्राउंड येथे महायुतीची तोफ धडाडणार आहे.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या प्रचारार्थ तपोवन मैदान येथे 5 नोव्हेंबर रोजी महामेळाव्याचा आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातच राज्याच्या प्रचाराला शुभारंभ होणार आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमीच कोल्हापुरातून प्रचाराचा शुभारंभ करत होते. तीच परंपरा ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. मेरी वेदर ग्राउंड येथे होणाऱ्या या मेळाव्या प्रसंगी महायुतीचे दहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार, राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

तर माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेची पहिली सभा राधानगरी विधानसभा मतदारसंघात होणार आहेत. ते देखील उद्यापासूनच प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांची आदमापूर या गावी सभा होणार आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार के.पी पाटील यांच्या प्रचारार्थ ते उपस्थित राहणार आहेत.

उमेदवारांकडे केवळ 14 दिवस

विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. तर 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराचा शेवट होणार आहे. दिवाळीमुळे रखडलेला प्रचार आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे 14 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळणार आहे. त्यामुळे येत्या 14 दिवसात गाठीभेटी, बैठका, चाय पे चर्चा, मिसळ पे चर्चा, कॉर्नर सभा, प्रचार रॅली अशा प्रचाराच्या विविध फंड्यांना जोर येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT