Kolhapur politics viral social media post issue Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : उध्वस्तरावांची शिल्लक सेना! जिल्ह्याच्या नेत्यानेच स्टेट्स झळकावला, अख्ख्या गावानं पाहिला अन् दोन मिनिटांत डिलीट  

Kolhapur Shiv Sena leader viral WhatsApp status controversy: आज सकाळी जवळपास नऊ वाजून पन्नास मिनिटांच्या अंतराने जिल्ह्यातील एका पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाच्या विरोधात व्हाट्सअप वर स्टेट्स ठेवल्याचे निदर्शनास आले.

Rahul Gadkar

Kolhapur political dispute over viral message: कोल्हापूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर एका राजकीय पक्षात कमालीची नाराजी आहे.

जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना या निवडणुकींमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे अपयश मिळाले हे तितकंच सत्य आहे. निवडणुकीनंतर अनेकांनी पक्ष सोडले. तर अनेकांनी अंतर्गत गटबाजीचे कारण देत पक्षांच्या पदाचा राजीनामा दिला तो स्विकारला नाही ही गोष्ट वेगळी.

दुसऱ्या पक्षातून पद मिळाल्याने या पक्षात अंतर्गत खदखद देखील बाहेर आली. त्यामुळे जिल्ह्यातील पक्ष संघटन  विस्कटले असताना जिल्ह्याच्या नेत्यांकडून थेट पक्षप्रमुखांना डिवचणारे स्टेट्स व्हाट्सअपवर झळकावले होते. जिल्ह्याच्या नेत्यांनी या पद्धतीचे स्टेट्स ठेवल्यानंतर पक्षात खळबळ उडाली आहे. मात्र वेळीच ही चूक लक्षात आल्यानंतर त्याबाबत खुलासा देखील देण्यात आला.

आज सकाळी जवळपास नऊ वाजून पन्नास मिनिटांच्या अंतराने जिल्ह्यातील एका पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाच्या विरोधात व्हाट्सअप वर स्टेट्स ठेवल्याचे निदर्शनास आले. हा स्टेट्स थेट पक्षप्रमुखांना डिवचणारा होता. या मध्ये "उध्वस्तरावांची शिल्लक सेना" या मथळ्याखाली वाघाच्या पिल्लाला बाटलीतून दूध पाजणारा फोटो देखील लावण्यात आला होता.

काहीजणांकडून या स्टेट्स चे स्क्रीन शॉट काढून व्हायरल करण्यात आले. मात्र ही चूक लक्षात येताच दोनच मिनिटांनी हा स्टेट्स डिलीट झाला. मात्र या घटनेमुळे संबंधित पक्षात चांगलीच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, याच जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून झालेला संबंधित प्रकार, नजर चुकीने झाला असून लहान मुलीकडून चुकून स्टेट्स ठेवण्यात आले होते. कोणीही याचा राजकीय प्रपोगंडा करू नये, त्यापेक्षा सध्याचे वास्तव पाहावे, असा खुलासा करण्यात आला.

संबंधित पदाधिकाऱ्यांच्या या खुलासानंतर बऱ्यापैकी पक्षातील वातावरण शांत झाले. मात्र तोपर्यंत खूप काही घडून गेलं होतं. संबंधित नेत्याच्या स्टेट्सची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. आता विरोधकांकडूनही याचे भांडवल केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजूनतरी संबंधित पक्षासह अन्य पक्षांतून त्यावर उघडपणे प्रतिक्रिया आलेल्या नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT