Ashok Kharat Video Viral : भोंदू खरातचे महिलांसोबतचे तब्बल 3500 अश्लील व्हिडिओ लिंक्स व्हायरल, तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर...

Ashok Kharat Case Video FIR : भोंदू बाबा अशोक खरातच्या तब्बल 3500 अश्लील व्हिडिओ लिंक्स व्हायरल झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
Police action intensifies in Ashok Kharat case after thousands of alleged obscene video links go viral.
Police action intensifies in Ashok Kharat case after thousands of alleged obscene video links go viral.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : भोंदू बाबा अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणात पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडवली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कडक पावले उचलत राज्यभरात 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल केले आहेत. विशेष तपास पथकाने या व्हिडिओशी संबंधित तब्बल 3,500 लिंक्स समाजमाध्यमांवरून हटवल्या आहेत.

नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात यांच्यावर लैंगिक शोषण, फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील पीडित महिलांच्या व्हिडिओ तसेच खरात यांच्या संबंधित क्लिप्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असल्याने पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे.

नाशिकसह कोपरगाव, बीड, अहिल्यानगर आणि राज्यातील इतर जिल्ह्यांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये सामान्य नागरिकांसह सोशल मीडियावर सक्रिय असलेले काही युजर्स समाविष्ट आहेत. ज्यांनी या लिंक्स व्हायरल केल्या त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे. तसेच ज्यांच्या मोबाईलमध्ये या लिंक्स असतील त्यांनी त्या डिलीट कराव्यात अन्यथा त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

एसआयटीने तातडीने कारवाई करत व्हायरल व्हिडिओंच्या ३,५०० हून अधिक लिंक्स काढून टाकल्या. यासोबतच अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम २९४(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. “सोशल मीडियावर अश्लील किंवा गोपनीय व्हिडिओ शेअर करणे गुन्हा आहे. यामुळे पीडित महिलांना मानसिक त्रास होत आहे,” असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Police action intensifies in Ashok Kharat case after thousands of alleged obscene video links go viral.
Ashok Kharat Viral Video: ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’, अशोक खरात बडबड करत सुटला! मोठमोठ्या गप्पा मारणारा 'कॅप्टन' पोलिसी खाक्यासमोर गार! (Video)

आणखी गुन्हे दाखल होणार

या प्रकरणात एसआयटी सध्या वेगाने तपास करत आहे. पीडित महिलांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून अधिक तक्रारी येत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमुळे प्रकरणाची गंभीरता वाढली असल्याचे दिसते. पोलिसांनी नागरिकांना असे व्हिडिओ शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. काही असून आणखी काहीं गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

Police action intensifies in Ashok Kharat case after thousands of alleged obscene video links go viral.
Ashok Kharat Video : अशोक खरातचे व्हिडिओ बाहेर कसे आले? "ऑफिस बाॅयच्या बायकोचा..."; पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा मोठा खुलासा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com