कोल्हापूर महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाचा फॉर्मुला निश्चित झाल्यानंतर स्थायी समिती सभापती पद कोणाला मिळणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती. मात्र या पदावर देखील भाजपने वर्चस्व मिळवले.
महिला आणि बालकल्याण व परिवहन समितीवरील सभापती पद कोणाकडे जाणार या संदर्भात अजूनही महायुतीमध्ये अंतर्गत ईर्षा लागून राहिली आहे. शिवाय या समितीवर कोणाला पाठवायचे याबाबत अद्याप नाव निश्चित नाही. आज सर्वच महायुतीचे नेते कोल्हापुरात असल्याने आज निर्णय होणे शक्य आहे.
स्थायी समिती सभापतिपद भाजपकडे असून, ते महिलेला द्यायचे की नवीन नगरसेवकाला द्यायचे, याचाही निर्णयही होणार आहे. शुक्रवारी (ता. २०) पहिली सर्वसाधारण सभा होत आहे. त्यामध्ये विषयपत्रिकेवर विविध समितींतील सदस्य नेमले जाणार आहेत.प्रत्येक पक्षाच्या संख्याबळानुसार त्या-त्या समितीत सदस्य पाठवायचे आहेत.
त्यासाठी अडीच वर्षांच्या कालावधीत कोणते पद कोणाकडे जाणार, हे ठरवण्याची गरज आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी सभापतीपद ठरले आहे. पण महापौर, उपमहापौर, स्थायी सभापतिपदात काही अदलाबदल करायचे हे जोपर्यंत ठरवले जात नाही, तोपर्यंत परिवहन, महिला बालकल्याण समितींचे सभापतिपद कोणाकडे द्यायचे, हे ठरणार आहे.
शिवसेना शिंदे गटाचा परिवहन व महिला बालकल्याण सभापतिपदावर दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून परिवहन सभापतिपद मिळावे, असे सांगितले जात आहे. परिवहन कुणाला? याबाबत उद्या दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते चर्चा करणार आहेत. तसेच स्थायी सभापतिपदासाठी कोणाला संधी द्यायची, यावर मंत्री चंद्रकांत पाटील सायंकाळी अंतिम चर्चा करणार आहेत.
सभापतिपदासाठी माधुरी नकाते, पल्लवी देसाई यांची नावे चर्चेत आहेत. महापौर महिला असल्याने सभापतिपदावरही महिलेला संधी द्यायची झाल्यास या नावांचा विचार होऊ शकतो. त्याशिवाय नवीन नगरसेवकांचीही चर्चा आहे. त्यात कोणाला सभापतिपद द्यायचे, यावर सदस्यांची नावे ठरविली जाणार आहेत. ते गृहित धरून पदांची वाटणी उद्या स्पष्ट झाल्यानंतर तेथे कोण सदस्य पाठवायचे, कुणाला पुढील वर्षांचे टार्गेट द्यायचे, हे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.