Chandrkant Patil - Satej Patil, Kolhapur north assembly by election News Updates, Kolhapur pot nivadnuk Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला; कोल्हापूरचे 'उत्तर' आज ठरणार...

Satej Patil | Chandrakant Patil | Congress | Bjp : खरी लढत दोन पाटलांमध्येच!

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : 'कोल्हापूर उत्तर' (Kolhapur) विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराचा धुरळा खाली बसल्यानंतर आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या (Congress) जयश्री पाटील (Jayshree Patil) रिंगणात आहेत, तर भाजपकडून (BJP) सत्यजित कदम निवडणूक लढवत आहेत. पोटनिवडणूक असली तरीही दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची बनवली आहे. काँग्रेस राज्यात सत्ताधारी असल्याने ही जागा राखण्यास उत्सुक आहे. तर भाजप पंढरपूर-मंगळवेढ्याच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सध्या आजी माजी पालकमंत्री अर्थात मंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Kolhapur north assembly by election News Updates)

.या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना कोल्हापुरात रंगला आहे. अशातच काल मतदानाच्या आदल्यादिवशी कोल्हापुरमध्ये एका भाजपच्या माजी नगरसेवकाच्या घरी पैशांची पाकिट सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी भाजपाच्या ३ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. उद्या होणार्‍या मतदानाच्या पार्श्वभूमीवर यादी घेऊन पाकिटातून पैसे वाटप करत असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर केला आहे.

याबाबत चौकशीअंती पोलिसांचा अहवाल समोर आल्यानंतर सत्य समोर येईल असे सांगितले जात आहे, मात्र काँग्रेसच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले कोणत्याही प्रकारचे पैसे वाटण्याचे काम भाजपकडून सुरू नाही. हे सर्व भाजपविरोधात अपप्रचार असू शकतो. भाजपला बदनाम करण्याचे विरोधकांचे काम सुरू आहे.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने कोल्हापूर उत्तरसाठी पोटनिवडणूक जाहिर झाली आहे. सुरुवातील भाजप जयश्री जाधव यांना पक्षात घेवून त्यांना भाजपच्या तिकीटावर निवडूण आणण्यासाठी आग्रही होते. मात्र जाधव यांनी नकार देत काँग्रेसकडूनच लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर भाजपने माजी नगरसेवक सत्यजित कदम यांना रिंगणात उतवले आहे. यासाठी आज मतदान पार पडत असून १६ एप्रिल रोजी निकाल लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT