Kolhapur News: कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत दोन राजेश नावाच्या उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होत आहे. महायुतीचे राजेश क्षीरसागर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत राजेश लाटकर या दोघांच्या पहिल्या नावात साम्य असल्यामुळे कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचे देखील गोची झाली आहे. मतदारापर्यंत पोहोचताना दोन उमेदवारांना मोठी कसरत करावी लागत आहे.
राजेश क्षीरसागर शिवसेनेचे उमेदवार असून त्यांचे चिन्ह धनुष्यबाण आहे तर लाटकर यांचे प्रेशर कुकर हे चिन्ह आहे. मात्र दोन्ही उमेदवार एकच नावाचे असल्याने प्रचारार्थ बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या शहराध्यक्षांची तारांबळ उडाली. त्यांनी थेट आपल्याच उमेदवाराचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात प्रचारात आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत राजेश लाटकर यांच्या प्रचारात कोल्हापुरात विविध ठिकाणी सभेचे आयोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या एका सभेत लाटकर यांचा प्रचार करत असताना सुनील मोदी यांनी राजेश लाटकर यांचाच पुराव्यानिशी 17 तारखेला आपण सायंकाळी पाच वाजता भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याची घोषणा स्टेजवर केले.
लाटकर यांच्याच प्रचारार्थ मोदी यांनी हे उद्गार काढल्यानंतर त्यांचा चांगलाच घोळ झाला. पंचायत झालेल्या मोदींना लाटकर यांच्या कार्यकर्त्यांनीच ताळ्यावर आणले. बोलण्याच्या ओघात सुनील मोदी यांनी राजेश लाटकर यांचे नाव घेतल्याने उपस्थितामध्ये चांगलाच हशा पिकला. मात्र मोदी यांना कार्यकर्त्यांनी झालेली चूक सांगत दुरुस्ती करण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत सुनील मोदी यांचे भाषण विरोधकांकडून व्हायरल करण्यात आले होते.
सध्या या व्हिडिओची कोल्हापुरात जोरदार चर्चा आहे. सोमवारी शहराध्यक्ष रविकरण इंगवले यांनी शहरात संपूर्ण उत्तरच उत्तर या आशयाखाली माहितीपट टक्केवारी पट्ट्याचा असे पोस्टर व्हायरल केले होते. त्यानंतर संध्याकाळी मोदी यांनी हे भाषण केल्यानंतर त्याची चर्चा चांगलीच रंगली होती.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.