Madhurimaraje Chhatrapati- Jayashree Jadhav Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur North Constituency : ‘कोल्हापूर उत्तर’ची उमेदवारी जयश्री जाधवांना की छत्रपती घराण्यात?; सतेज पाटलांपुढे पेच!

Kolhapur North ticket Satej Patil tough decision: महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसला जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, निवडणुकीला केवळ तीस ते पस्तीस दिवस शिल्लक असताना काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी उमेदवार कोण असणार? याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur, 18 October : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना पुन्हा संधी मिळणार की? काँग्रेस नवा उमेदवार देणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसला जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, निवडणुकीला केवळ तीस ते पस्तीस दिवस शिल्लक असताना काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी उमेदवार कोण असणार? याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. शिवाय, खासदार शाहू छत्रपती यांच्या सून आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमाराजे छत्रपती (Madhurimaraje Chhatrapati) यांचेही नाव चर्चेत आहे.

आमदार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची मी विद्यमान आमदार आहे, त्यामुळे जनतेचा पुन्हा आग्रह आहे की, तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे, असेही आमदार जयश्री जाधव यांनी स्पष्ट केले.

स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांचे स्वप्न मला साकार करायचे आहे. काम करायला मला खूप कमी वेळ मिळाला आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे, त्यानुसार कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये चर्चा सुरू असतील. मात्र, आमचे नेते जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, असेही आमदार जयश्री जाधव यांनी स्पष्ट केले.

कोण आहेत मधुरिमाराजे छत्रपती?

माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या अशी मधुरीमाराजे छत्रपती यांची प्रमुख ओळख आहे. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या त्या सूनबाई आहेत. युवराज मालोजीराजे छत्रपती हे 2004 मध्ये त्यावेळी कोल्हापूर आणि आत्ताचे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत.

मधुरिमाराजे छत्रपती यांना लहानपणापासूनच घरातून राजकारणाचे धडे मिळाले आहेत. राजकारणाबरोबरच सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांची कामगिरी राहिली आहे. महिलांचं संघटन ही त्यांची जमेची बाजू आहे. लोकसभा निवडणुकीत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारात त्या आघाडीवर होत्या.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT