Congress Candidate Fake List : काँग्रेसच्या फेक यादीने इच्छुकांची उडाली झोप

Maharashtra Congress : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची जोरदार तयारी चालवली आहे. प्रत्येक जण उमेदवारी मिळावी, यासाठी राजकीय पक्षांच्या हायकमांडकडे फिल्डिंग लावत आहे, त्यामुळे अनेक जण राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारी यादीकडे डोळे लावून बसले आहेत.
Congress
CongressSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 18 October : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व इच्छुक उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत. सर्व इच्छुकांचे डोळे राजकीय पक्षांच्या उमेदवारीकडे लागले आहेत. त्यातच गुरुवारी (ता. 18 ऑक्टोबर) रात्री उशिरा काँग्रेस पक्षाची एक यादी समाज माध्यमांवर व्हायरल झाली.

त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची नावे होती, त्यात नावे असणाऱ्यांना हायसे वाटले. पण, इच्छुकांची मात्र झोपच उडाली. मात्र, ती यादी फेक असल्याचे स्पष्टीकरण खुद्द काँग्रेस पक्षाकडून देण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) इच्छुकांची जोरदार तयारी चालवली आहे. प्रत्येक जण उमेदवारी मिळावी, यासाठी राजकीय पक्षांच्या हायकमांडकडे फिल्डिंग लावत आहे, त्यामुळे अनेक जण राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारी यादीकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

आघाडी आणि युतीकडून अद्याप जागांचे वाटप जाहीर झालेले नाही, त्यामुळे उमेदवारांची यादी अद्याप प्रसिद्ध होऊ शकली नाही. मात्र, गुरुवारी रात्री उशिरा काँग्रेस पक्षाची (congress) एक यादी जाहीर झाली. त्या यादीत ज्यांचे नाव आहे, त्यांना हायसे वाटले. मात्र, त्या मतदारसंघातील इच्छुकांची मात्र झोप उडाली.

त्या यादीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, ऋतुराज पाटील, अस्लम शेख, रवींद्र धंगेकर यांच्या नावाचा समावेश आहे. त्या यादीवर के. सी. वेणुगोपाल यांची सही आहे, त्यामुळे त्या यादीबाबत कोणालाही संशय वाटला नाही.

Congress
Vijaykumar Deshmukh : सोलापुरात आलेल्या भाजप नेत्याच्या शुभेच्छा...शहर उत्तरमधून देशमुखांची उमेदवारी निश्चित?

काँग्रेस पक्षाकडून जाहीर झालेल्या त्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघाचा समावेश आहे. सोलापूर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर ही त्या दोन मतदारसंघाची नावे आहेत. विशेष म्हणजे याच दोन मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून सर्वाधिक इच्छुक आहेत, त्यामुळे या मतदारसंघाच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांचे नाव त्या यादीत होते. या मतदारसंघात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक इच्छुक आहेत. या मतदारसंघाचे प्रणिती शिंदे यांनी नेतृत्व केले आहे. तसेच, या मतदारसंघासाठी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांचाही दावा आहे.

दुसरीकडे, दक्षिण सोलापूरमधून सिद्धेश्वर सहकारी साखर काखान्याचे वरिष्ठ संचालक धर्मराज काडादी यांचे नाव जाहीर झाले आहे. या मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, उद्योजक महादेव कोगनुरे, धर्मराज काडादी हे इच्छुक आहेत. मात्र ज्या काडादींनी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी मागितली नाही, त्यांनाच उमेदवारी दिल्याचे त्या यादीत नमूद होते.

Congress
Western Maharashtra Politics : पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या पाठीशी उभारणार?; सध्या कोणाकडे किती आमदार पाहा...

त्या यादीमुळे इच्छुकांची झोप उडाली. अनेकांनी शहराध्यक्ष, काँग्रेसच्या वरिष्ठांना फोन करून विचारणा केली. मात्र, कुठेच ठोस उत्तर मिळत नव्हते, त्यामुळे इच्छुकांचे अवसान गळाले होते. शेवटी प्रदेश काँग्रेसकडून ती यादी फेक असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले, त्यामुळे इच्छुकांचा जीव भांड्यात पडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

mahayuti and mva
Ranjitsinh Shinde | Babanrao Shinde
100 Fake Godmen Arrested | Ashok Kharat
Nashik Collector Ayush Prasad Fake WhatsApp Account
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com