Kolhapur News : कसबा बावडा येथील ड्रेनेज लाईन कामाचा 85 लाखाचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर संबंधित ठेकेदाराने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच अधिकाऱ्यांचे कमिशनचे 'रेट कार्ड' पाठवत लेटर बॉम्ब टाकला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी या कामात एक- दोन टक्के कमिशन घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावासकट कोणाला किती रुपये दिले सविस्तर मेल थेट मुख्यमंत्र्यांना धाडला आहे.
या संपूर्ण प्रकारानंतर कोल्हापूर महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे. ठेकेदार श्रीपाद वराळे यांनी कोणत्याही चौकशीला सामोरे जाणार असल्याचेही स्पष्ट करत मोठ्या ठेकेदारांना वाचवण्यासाठी माझा बळी देत असल्याचा आरोपी यावेळी या मेलच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्याकडे केला आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले आहेत की, मी श्रीप्रसाद संजय वराळे माझ्यावरती झालेल्या खालील आरोपांची आपण सखोल चौकशी करावी ही आपणास विनंती. माझ्यावरती माझ्या नावे मंजूर असणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत होणाऱ्या प्रभाग क्रमांक दोन कसबा बावडा पूर्व बाजू अंतर्गत जाधव घर ते बडबडे मळा ड्रेनेज पाईपलाईन काम मंजूर होते. सदर कामातील पाचवे रनिंग बिल 85 लाख रुपये घेतले असा आरोप करण्यात आला आहे.
परंतु सदर पाचवे बिल रक्कम जीएसटी सोबत 72 लाख 16 हजार 396 रुपये 50 पैसे इतकी होते. ती माझ्या महानगरपालिकेमधील नोंदणीकृत युनियन बँक चालू खाते क्रमांक 471101010280337 या खात्यावरती दिनांक 24-12 -2014 रोजी सायंकाळी 4 वाजून 39 मिनिटे 6 सेकंद कोल्हापूर महानगरपालिका यांच्या खात्यावरून 67 लाख 58 हजार तीन रुपये इतकी रक्कम माझ्या खात्यावरती जमा झाली.
सदर कामाच्या बिल मिळण्याकरिता मी महापालिकेतील कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांना 2 टक्के प्रमाणे 1 लाख २० हजार रोख , उपशहर अभियंता कांबळे साहेब यांना १ टक्के प्रमाणे ६० हजार रोख , शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना शासन अनुदान असल्यामुळे दोन टक्के याप्रमाणे १ लाख २० हजार रोख महापालिकेमध्ये दिले .
अकाउंट विभाग मधील क्लार्क नाईक, अधीक्षक सूर्यवंशी साहेब, यांना प्रत्येकी लाखाला 100 याप्रमाणे प्रत्येकी 6 हजार बिलावरती सही करताना दिले. तसेच ऑडिट विभाग मधील क्लार्क यांना लाखाला 100 तसेच लेखापरीक्षक परीट मॅडम यांना लाखाला 200 व मुख्य लेखा परीक्षक मिसाळ मॅडम यांना लाखाला 200 अशा पकारे एकूण ३० हजार रुपये प्रत्येक सही करताना सोबत विभागांमध्ये दिले तसेच अतिरिक्त आयुक्त रोकडे यांना १ टक्के ६० हजार रुपये दिले. असा आरोप वराळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केले आहे.
सदर बिल मिळण्याकरिता जी शासन नियमावली आहेत. त्या पद्धतीनेच मला हे मिळालेला आहे. यामध्ये कोणताही घोटाळा करण्यात आलेला नाही .सदर बिलांपैकी जागेवरती माझे 800mm पाईपचे 1125 रनिंग मीटर काम पूर्ण असून 18 चेंबर्स पूर्ण आहेत. 312 मीटर पाईप जागेवरती उपलब्ध होत्या त्यापैकी जानेवारीपासून २०२५ ते मे २०२५ महिन्यापर्यंत मी 70 ते 80 मीटर काम जसं मला जागेवर काम करण्यास उपलब्ध होईल ते मी बसवलेले आहेत. व त्याचे वेळोवेळीचे व्हिडिओ हे शहर अभियंता उप शहर अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना पाठवले आहेत .परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी विरोध केला असता ते माझे काम थांबले गेले. याची मी कल्पना संबंधित महापालिका अधिकारी यांना दिले असता, त्यांनी जागेवरती येऊन पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेऊन तोडगा काढू अशी अशी ग्वाही दिली होती .
सदर कामाचे पैसे परत जाणार म्हणून मला सदर बिलामध्ये झालेल्या काम व थोडी ऍडव्हान्स रक्कम अदा करण्यात आली आहे. सदर कामाची अजून 93 लाख रुपये रक्कम बिलाची महानगरपालिकेमध्ये शिल्लक आहे. मला जर घोटाळा करायचा असता तर मी सर्व रकमेचा केला असता. झालेल्या काम व त्यांनी दिलेल्या ऍडव्हान्स रक्कमेचाच का केला? हा माझा प्रश्न आहे. याच्या आधी देखील मी महापालिकेमध्ये 2017 पासून काम करतोय माझे कसबा बावडा मधील पॅवेलियन ग्राउंड विकसित करणे, कसबा बावडा स्मशानभूमी, गटरची कामे , यांची बिले काढतानाही मी वेळोवेळी संबंधित शहर अभियंता उपशहर अभियंता कनिष्ठ अभियंता व वरील मी नमूद केल्यास सर्वांना नियमाप्रमाणे बिल काढण्यासाठी त्यांनी जी मागणी केली. त्याची त्या पैशाची मी पूर्तता करून बिल मला प्राप्त झाले आहे. याची तुम्ही चौकशी करू शकता.
मध्यंतरी राजाराम कारखानाच्या संबंधित असणाऱ्या केसमुळे मी तुरुंगात होतो. त्यावेळी मी प्रभाग क्रमांक ६ मधील झूम प्रकल्प येथील मध्ये काम भरतेवेळी माझ्याकडून खोटे साजरी केले. हा आरोप केला होता. सदर कामासाठी लागणारे एफिडेविट कोणताही ठेकेदार तहसीलदार यांच्यासमोर जाऊन करत नाही. ते स्पॅम्प वेंडर यांना सांगून तयार करून घेतात. व ते अपलोड करतात सदर न केलेल्या गुन्ह्यासाठी मला ब्लॅक लिस्ट करावे म्हणून महापालिकेला तक्रार कॉन्ट्रॅक्टर राहुल पाटील यांच्या द्वारे करण्यात आली होती. तिन्ही देखील ते एफिडेविट तहसीलदार यांच्यासमोर जाऊन केले आहे का? याचा व्हिडिओ एव्हिडन्स त्यांनी सादर करावा. सदर एफिडेविट तक्रारीचा फायदा घेऊन तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी मला तुझे रजिस्ट्रेशन ब्लॅक लिस्ट करत नाही. यासाठी माझ्याकडून कावळा नाका येथील पोलीस चौकीच्या थोड्या पुढ अंतरावरती मे 2024 मध्ये साधारण दुपारी बारा ते दोन च्या दरम्यान अडीच लाख रुपये रोख रकमेमध्ये घेतले होते. व माझ्यावरील मी न केलेल्या गुन्ह्याचे कारवाई थांबवली होती. वेळोवेळी मला महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले त्याप्रमाणे आज पर्यंत मी कसबा बावडा स्मशानभूमी मध्ये ऍडव्हान्स काम केलेले , कोविडच्या दरम्यानची शेड त्यानंतर त्याचे बदललेले पत्रे , प्रभाग क्रमांक पाच अंतर्गत आंबे गल्ली येथे केलेली गटर , प्रभाग क्रमांक चार मध्ये उभारलेले कोविड सेंटर याची मला अजूनही अंदाजे 15 ते 20 लाख रुपये ची रक्कम मला मिळालेली नाही. हे काम मी संबंधित अधिकारी यांच्या सांगण्यावरूनच ऍडव्हान्स मध्ये केले होते. जशी की आत्ता मला ॲडव्हान्स रक्कम दिलेली आहे .कसबा बावडा अंतर्गत करण्यात आलेली माझी कामे व इतर ठिकाणी केलेली कामे तुम्ही बघू शकता .कसबा बावड्याची स्मशानभूमी , पेवेलियन ग्राउंड ची सुधारणा , बास्केटबॉल , चॅनेल ची कामे गटाची कामे रस्ते प्रभाग क्रमांक 18 मध्ये केलेली रस्ते कॉंक्रिटची कामे प्रभाग क्रमांक 11 मध्ये केलेली गटची कामे रस्ते याची तुम्ही चौकशी व माहिती घेऊ शकता.
सदर प्रभाग क्रमांक २ बावडा ड्रेनेज लईन कामांमध्ये अडथळे निर्माण ही जाणीवपूर्वक केलेली आहेत. याची कल्पना मी अधिकाऱ्यांना दिलेली होती. आज पर्यंत मी महापालिकेत केलेल्या सात ते आठ कोटी रुपयांच्या कामाकरिता बिल घेण्याकरत 60 ते 65 लाख रुपये मी बिलाच्या टक्केवारीच्या स्वरूपात दिलेली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये टेंडर होण्याआधीही ऍडव्हान्स मध्ये कामे होतात त्यामध्ये भ्रष्टाचार घोटाळा होत नसेल का? माझे हे काम टेंडर झाल्यानंतर होऊन त्याची रीतसर बिल घेतले आहे. सदरचे काम चालू आहे. स्थानिक शेतकरी यांनी केलेला विरोध व चालू असलेल्या पाऊस यामुळे काम थांबलेला आहे .मी ते काम करण्यास नकार दिलेलं नाही. मी त्या कामाचे पूर्ण बिल घेतलेले नाही. मग मी हा घोटाळा केला कसा ? यामध्ये माझा काहीही गुन्हा नसताना माझ्यावरती खोट्या सह्या करून बिल घेतले असा आरोप केला त्यावेळी मला महापालिका अधिकारी यांनी राजारामपुरी मध्ये बोलून घेऊन तुम्ही पत्र द्या आम्ही तुम्हाला वाचवू नाहीतर तुमच्यावरती पोलीस केस व तुमचे महापालिकेमध्ये असणारे 40 ते 50 लाख रुपये डिपॉझिट परत करणार नाही, असे सांगितले. त्यामुळे मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितल्या शासकीय भाषेत माझ्याकडून ते माझ्या हस्ताक्षर मध्ये लिहून घेतले. मी ते पत्र त्यांच्याकडे त्याच कॅफेमध्ये दिले. मी आज पर्यंत महापालिकेला कोणतीही पत्र हस्ताक्षर मध्ये लिहून स्वरूपात दिलेले नाही. सर्वकाही टायपिंग मध्ये दिलेले आहे. सदर बिल खरे की खोटे सदर बिलावरील सह्या खाऱ्या की खोट्या सदर सोडण्यात आलेले बिल ऑनलाईन खरे की खोटे याची चौकशी करावी. ठेकेदार बबन पवार यांनी ॲडव्हान्स मध्ये केलेल्या कामांची चौकशी होऊ नये व ती टेंडरला लागून व्यवस्थित बिले निघावं यासाठी ही या कामांमध्ये मुद्दाम अफवा आरोप माझ्यावर केले जात आहेत .
ठेकेदार बबन पवार यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून बऱ्याच ठिकाणी ऍडव्हान्समध्ये काम केलेले आहेत. त्याची गुणवत्ता ही तपासावी टेंडरच्या आधी त्यांनी काम कसे केले हेही तपासावे. त्यांना कोणी परवानगी दिली हेही तपासावे. यामध्ये भ्रष्टाचार आहे. घोटाळा आहे की नाही हेही तपासावे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालय समोरील चालू असलेल्या रस्त्याच्या कामाची ही चौकशी व्हावी.
.
बबन पवार यांनी केलेल्या कामांची चौकशी होऊ नये म्हणून माझ्यावरती या गोष्टी लादल्या जात आहेत . मी सर्व चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे परंतु माझ्यासोबत इतर सर्व अधिकाऱ्यांचेह चौकशी व्हावी मी कामामध्ये कोणताही घोटाळा केलेला नाही. माझे काम अजून चालू आहे मी अजून काम करण्यास तयार आहे. हे माझे पाचवे रनिंग बिल आहे. सदर कामाची 93 लाख रक्कम अजून महापालिकेमध्ये शिल्लक आहे. तरीही माझ्यावरती हा आरोप केला जात आहे .कोणा दुसऱ्या ठेकेदार व अधिकारी यांना वाचवण्यासाठी माझा बळी दिला जात आहे. या सर्व अधिकाऱ्यांची संपत्तीची मिळकतींची चौकशी व्हावी सध्या चालू असलेल्या आरोपांमुळे माझ्या घरच्यांचे व माझे मानसिक खच्चीकरण झाले आहे तसेच अब्रूचे लचके काढले आहेत. महापालिका अधिकारी व ठेकेदार बबन पवार याचा मला प्रचंड त्रास देत आहेत. सदर त्रासामुळे ते मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत. माझ्या घरच्यांना व मला काही झाल्यास सर्वस्वी जबाबदार हे ठेकेदार बबन पवार व महापालिकेचे संबंधित अधिकारी असतील. तरी माझी आपणास नम्र विनंती आहे मी मांडलेल्या विषयाचा विनंतीपूर्वक व गांभीर्य लक्षात घेऊन झालेल्या आरोपांचा आपण सखोल चौकशी करून मला न्याय द्यावा ही विनंती, असे देखील पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.