Tihar Jail News: ऐन निवडणुकीच्या काळात तिहार तुरुंग रडारवर? बॉम्ब हल्ल्याच्या धमकीमुळे प्रशासनाची धावपळ

Tihar Jail Delhi Crime News: दिल्लीतील शाळा, विमानतळ आणि रुग्णालयानंतर आज तिहार तुरुंग प्रशासनाला बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणाचा तपास सध्या दिल्ली पोलिसांकडून सुरु आहे.
Tihar Jail Delhi
Tihar Jail DelhiSarkarnama
Published on
Updated on

Tihar Jail Gets Bomb Threat: शाळा विमानतळ आणि रुग्णालयानंतर आता दिल्लीतील तिहार तुरुंगात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ईमेलद्वारे तुरुंग प्रशासनाला ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात धमकी येण्याच्या प्रकरणामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

दिल्लीतील शाळा, विमानतळ आणि रुग्णालयानंतर आज (14 मे) रोजी तिहार तुरुंग प्रशानाला ईमेलद्वारे धमकी देण्यात आली. याप्रकरणाचा तपास सध्या दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) सुरु असून धमकी देणाऱ्याचा शोध पोलिस घेत आहेत. तर धमकीनंतर तत्काळ तुरुगांच्या परिसरात बॉम्ब स्कॉड तैनात करण्यात आली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मिळालेल्या माहितीनुसार, तिहार तुरुंग प्रशासनाला (Tihar Jail Administration) बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा एक ईमेल प्राप्त झाला. तुरुंग प्रशासनाने या ईमेलची माहिती दिल्ली पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी तपास सुरू केला. महत्वाची बाब म्हणजे सध्या तिहार तुरुंगात अनेक हाय प्रोफाईल प्रकरणातील आरोपींना ठेवण्यात आलं आहे. यात काही राजकीय नेत्यांचाही समावेश आहे.

Tihar Jail Delhi
ED Chargesheet News : ‘ईडी’ पहिल्यांदाच राजकीय पक्षाला करणार आरोपी; कोर्टातच दिली माहिती...

धक्कादायक बाब म्हणजे सोमवारी दिल्लीतील (Delhi) काही रुग्णालयांना अशीच धकमी देण्यात आली होती. यामध्ये जीटीबी रुग्णालय, दादा देव रुग्णालय, हेडगेवार रुग्णालय आणि दीपचंद्र बंधू रुग्णालयाचा समावेश होता. तर काही दिवसांपूर्वी दिल्लीतील शंभरहून अधिक शाळांना अशीच धमकी मिळाली होती. त्यामुळे सतत येणाऱ्या धमक्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com