कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे.
आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला असून तो उघड करणार असल्याचे ते म्हणाले.
निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षात गेलेल्या नगरसेवकांना “जागा दाखवू” असा कठोर इशाराही त्यांनी दिला आहे.
Kolhapur News : कोल्हापूर नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबरोबरच आता कोल्हापूर महानगरपालिकेचे राजकारण हळूहळू तापायला सुरुवात झालेली आहे. जिल्हाभरात दौरे करत असताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक तितकीच गांभीर्याने घेतली आहे. मुळात आमदार पाटील यांचा राजकीय कट्टर विरोधक महाडिक गट असून त्यांच्या आणि महाडिक गटाभोवतीच जिल्ह्याचे राजकारण फिरत आले आहे. यंदा मात्र महापालिकेच्या निवडणुकीत आमदार पाटील यांनी नवीन राजकीय विरोधक अंगावर घेतल्याचे चित्र आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर विरुद्ध आमदार सतेज पाटील असा नवा राजकीय संघर्ष निर्माण होताना दिसत आहे.
काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संघर्षाची अनेक कारणे आहेत. बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार के पी पाटील यांच्या विरोधात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पॅनल उभा केले. त्यावेळी सतेज पाटील हे माजी आमदार के पी पाटील यांच्या पाठीशी राहिले होते. आबिटकर गटाचा पराभव झाला होता. त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील ठाकरे सेनेचे उमेदवार माजी आमदार के पी पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात घेतलेली भूमिका कारणीभूत आहे.
2024 च्या निवडणुकीनंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेल्यानंतर त्याची जबाबदारी आबिटकर यांच्यावर देण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि कोल्हापूरच्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने अनेक काँग्रेसमधील मातब्बरांना आपल्या पक्षात घेतले आहे.
पालकमंत्री आबिटकर यांनी थेट सतेज पाटील यांच्या काँग्रेसच्या गटनेत्यालाच हात घातल्याने साहजिकच पाटील यांना पालिकेच्या राजकारणात धक्का मिळाला आहे. इतकेच नव्हे तर आमदार पाटील यांचा बालेकिल्ला असलेला कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उपनगरातील प्रमुख चेहरा शारंगधर देशमुख यांनाच गळाला लावल्याने त्याचा परिणाम पाटील गटावर झाला आहे. त्यांच्यासोबत अनेक मातब्बर निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्यासोबत माजी महापौर आजगेकरांसह अनेक नगरसेविका आणि नगरसेवक गेल्याने सहाजिकच पाटील गटाचा आबिटकर यांच्या विरोधात रोष आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एकट्यालाच झगडावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ठाकरेंची शिवसेना सध्या महापालिका राजकारणात कमकुवत आहे. कठीण परिस्थितीच्या काळात काँग्रेसच्या प्रमुख शिलेदारांनी आमदार पाटील यांची साथ सोडल्याने फटका महापालिकेच्या राजकारणात बसू शकतो. त्यामुळे महापालिका निवडणुकीला अजून दोन महिने अवघी आमदार पालकमंत्री यांनी थेट काँग्रेस सोडून जाणाऱ्या आणि पालकमंत्र्यांनाच थेट इशारा देत आपली भूमिका स्पष्ट करून दिले आहे.
सतेज पाटील नेमके काय म्हणाले?
आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचारातूनच पुढील काळात महापालिका निवडणुकात प्रभागात तुम्हाला विविध आमिष दाखवली जातील. अमिषांना बळी न पडता प्रभागाच्या विकासासाठी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. आरोग्य विभागातील भ्रष्टाचार बाहेर काढणार असून निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षात गेलेल्या नगरसेवकांना त्यांची जागा दाखवून देणार.
विरोधी पक्षाकडून मतदारांना विविध आमिषे दाखविली जातील, पण भूलथापांना बळी न पडता काँग्रेसला पाठबळ देण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. विरोधी पक्षात गेलेल्या माजी नगरसेवकांसह अनेकांचा लवकरच कार्यक्रम लावला जाणार असून, एकालाही सोडले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
FAQs :
ते म्हणतात की पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागात मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
विरोधी पक्षात गेलेल्या नगरसेवकांना निवडणूक काळात “त्यांची जागा दाखवू” असे त्यांनी म्हटले.
सतेज पाटील यांनी आबिटकरांवर टीका करताच ‘पाटील विरुद्ध आबिटकर’ असा नवीन संघर्ष उभा राहिला.
होय, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आरोप अधिक गंभीर झाले आहेत.
ते आरोग्य विभागातील कथित मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपशील लवकरच समोर आणणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.