Kolhapur, 27, March 2025: लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हक्काची जागा काँग्रेसला सोडली. त्यानंतर कागल विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला मताधिक्य दिले. पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून आपल्याला मदतच झाली नाही. काँग्रेसचे विमान मतदारसंघात उतरलेच नाही. प्रामाणिक फक्त राष्ट्रवादीनेच वागायचे का? असा खडा सवाल कोल्हापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांच्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुटून पडले.
जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असले तर,आम्ही कार्यकर्त्यांनी काय करायचं तेही सांगा, अशा शब्दात त्यांनी मेळाव्यात आपली नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे ‘एक दिवस राष्ट्रवादीसाठी पदाधिकारी मेळावा’ झाला. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, तर समरजितसिंह घाटगे प्रमुख उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या भावनेमध्ये एकच सूर उमटला. राष्ट्रवादी पक्ष कोणाच्या दावणीला बांधायचा नसेल तर एअर कंडिशन गाडी मधून बाहेर पडा. जरा कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या. त्यांच्या खांद्यावर जू ठेवू नका, त्यांना पाठबळ द्या. असा सुरू उमटला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्धार यावेळी केला. जिल्हा परिषदेची माजी सदस्य शिवानंद माळी यांनी देखील काँग्रेसवर निशाणा साधला. सभा निवडणुकीत कागल मतदार संघात काँग्रेसची मदत झाली नाही. त्वरित मतदार संघात काँग्रेसने सर्वस्व पणाला लावले. त्यामुळे प्रामाणिक फक्त आपणच राहायचे का? असा सवाल उपस्थित केला. प्रदेश चिटणीस शिवाजी खोत यांनी विधानसभेला सर्वसामान्य कार्यकर्ता कुठे कमी पडला नाही. कॉंग्रेसच्या नेत्यांचे हेलिकॉप्टर कागल, गडहिंग्लजला का उतरले नाही, याचे उत्तर सतेज पाटील यांनी द्यावे.
दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र येणार या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आम्ही कार्यकर्त्यांनी पुढे काय करायचे ते सांगा? अशी ठाम मागणी त्यांनी केली. तोच मुद्दा रामराजे कुपेकर यांनी पुढे नेत याबाबत पक्षाच्या वरिष्ठांना भेटण्याचे मत मांडले.पक्ष एकत्र होण्याबाबत राज्यात जी काही चर्चा सुरू आहे, त्याबाबतच्या आपल्या भावना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत पोहोचविल्या जातील. पुढे काय करायचे हे त्यांना विचारण्यात येईल’, असे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी स्पष्ट केले.
आपल्याला महाविकास आघाडीबरोबर रहावे लागेल.असे मत जिल्हाध्यक्ष व्ही. बी.पाटील यांनी व्यक्त केले. काही नाराजी असेल, तर आम्हाला सांगा. परस्पर कोणताही निर्णय घेऊ नका. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी संघटीतपणे विरोधकांशी आगामी निवडणुकांमध्ये लढूया’ असे आवाहन आर. के. पोवार यांनी केले
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.