Pune Congress News: पुणे काँग्रेस शहराध्यक्ष पदासाठी लॉबिंग; 'ही' नावे चर्चेत

Pune Congress City President: प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आता नवे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रामध्ये नव्याने पक्ष संघटना बांधतील आणि संघटनात्मक काही फेरबल करतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे पुण्यातील काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलाबाबत पुन्हा एकदा फिल्डिंग सुरू झाली आहे.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan SapkalSarkarnama
Published on
Updated on

Pune News: नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नुकतेच पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्या दरम्यान सपकाळ यांच्याकडे काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचला. मात्र प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांनी मी काही सूचनापेटी नाही तक्रारी करू नका असं संबंधितांना सुनावलं. यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानिमित्त पुन्हा एकदा पुणे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळालं.

यानंतर आता पुणे शहर काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. पुण्यातील विविध गटांकडून शहराध्यक्ष पदासाठी लॉबिंग करण्यात येत आहे. या वेगवेगळ्या गटांकडून पुणे कॉग्रेस शहराध्यक्ष पदासाठीचे वेगवेगळी नावं चर्चेत आहे.

पुणे शहरातील काँग्रेसचा शहराध्यक्ष बदलावा यासाठी गेल्या काही काळापासून काँग्रेसमधील काही गट कार्यरत आहेत. सुरुवातीला लोकसभा निवडणुकीपूर्वी शहराध्यक्ष बदलावा, यासाठी पुण्यातील काही काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते.

मात्र त्याला यश आले नाही त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील काँग्रेस मधील एका गटाने तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे शहराध्यक्ष बदलाबाबतचे साकडे घातले होते. मात्र , त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने थेट दिल्लीतून या गटाने शहराध्यक्ष बदलाबाबतचं लॉबिंग केल्याचं समोर आलं होत. मात्र त्याला देखील यश आलं नाही.

Harshwardhan Sapkal
Santosh Deshmukh Case: मोठी बातमी: होय, आम्हीच देशमुखांची हत्या केली ! मास्टरमाईंडसह तीन आरोपींची कबुली

विधानसभा निवडणुकीमध्ये सबंध महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. यानंतर प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी राजीनामा दिला असून हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारली आहेत.

प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आता नवे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रामध्ये नव्याने पक्ष संघटना बांधतील आणि संघटनात्मक काही फेरबल करतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे पुण्यातील काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलाबाबत पुन्हा एकदा फिल्डिंग सुरू झाली आहे.

सध्या पुणे शहरांमध्ये काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून अरविंद शिंदे हे कार्यरत आहेत. गेल्या तब्बल चार वर्षापासून अरविंद शिंदे हे शहराध्यक्ष आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला शहराध्यक्षपदावर कायम ठेवावं यासाठी अरविंद शिंदे प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. तसेच जर शहराध्यक्ष बदलायचा असेल तर शहर कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी असलेले अजित दरेकर यांना शहराध्यक्ष करावं, यासाठी शिंदे प्रयत्नशील असल्याचं सांगितलं जात आहे.

Harshwardhan Sapkal
Snehal Jagtap: भरतशेठचं टेन्शन वाढलं!ठाकरेंची 'वाघीण' भाजपमध्ये जाण्यापूर्वीच अजितदादांकडून मोठी खेळी

शहराध्यक्ष बदलाबाबत मागील वेळेस एका कॉग्रेसच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रभारी चेन्निथला तसेच बाळासाहेब थोरात आदींची मुंबईत भेट घेतली होती. त्यावेळेस या शिष्टमंडळाकडून शहराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक राहिलेल्या चंदू कदम यांचं नाव पुढे करण्यात आले होते.

मात्र आता चंदू कदम यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शहराध्यक्ष पदाच्या रेस मधून आपलं नाव मागे घेतलं असल्याचं समजते. त्यामुळे आता या गटाकडून माजी नगरसेवक अविनाश बागवे यांचं नाव शहराध्यक्ष पदासाठी पुढे करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अविनाश बागवे हे उत्तम चेहरा असून त्यांना महापालिकेत विविध पदांवरती काम केलं असून त्यांना महापालिकेची चांगली जाण आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत त्यांच्यासारखा युवा आणि आक्रमक चेहरा दिल्यास काँग्रेसला फायदा होईल, अशी भूमिका या गटाकडून मांडण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.

त्यासोबतच आणखी एक गट ज्यामध्ये माजी आमदार आणि सध्या काँग्रेस उपाध्यक्ष असलेल्या नेत्याकडून शहराध्यक्ष पदासाठी सुनील मलके यांच्यासाठी फिल्डिंग लावली जात असल्याचे बोलले जात आहे.याशिवाय, विरेंद्र किराड, गोपाळ तिवारी, संजय बालगुडे ही नावे देखील शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com