Kolhapur Politics: 
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: बंडखोरांना रोखण्यासाठी पवारांचा मास्टर प्लॅन; मुश्रीफांना दिल्या सूचना

Kolhapur Politics| संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशिल माने यांनी बंडखोरी केल्याने कोल्हापूरात शिवसेनेला खिंडार पडले आहे.

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला आमदारांनंतर आता खासदारांनीही पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर (Kolhapur Politics) जिह्यातील खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशिल माने यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आगामी निवडणुकांमध्ये खासदार कोण असणार याचीच चर्चा रंगली आहे. मंडलिक आणि माने यांच्या बंडखोरी केल्याने कोल्हापूरात शिवसेनेला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गुरुवारी (२१ जुलै) कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती समजून घेत नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे.

गुरुवारी शरद पवार आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना फोन करून लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. ( Sharad Pawar) कोल्हापूर हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना फोन करत तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे.

मंडलिक आणि माने यांच्या दोन्ही मतदार संघावर नजर ठेवून त्यांनी आतापासूनच मुश्रीफ यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपल्याला नवीन उमेदवार तयार करण्यासाठी लक्ष घालण्याच्या सूचना शरद पवार यांनी मुश्रीफ यांना दिल्या आहेत. तसेच लोकसभेची निवडणूक लढविण्याची आपली इच्छा नाही; पण पक्षाने आदेश दिला तो आपण नाकारणार नाही, असेही स्पष्टीकरण मुश्रीफ यांनी दिले आहे.

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे गेल्या महिन्याभरात राज्यातील अनेक जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. कोल्हापूरमध्येही शिवसेनेचे दोन्ही खासदार फुटल्याने शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. कोल्हापूरातील बदललेल्या राजकीय परिस्थितीबाबत शरद पवार प्रत्येक जिल्ह्यातील नेत्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत. आगामी निवडणूकांसाठी तयारीला लागण्याचे आवाहन त्यांनी नेत्यांना, कार्यकर्त्यांना केले आहे.

कोल्हापूरातील शिवसेनेचे दोन्ही खासदार शिंदे गटात सामील झाले. 2019 मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार धनंजय महाडिक भाजपात गेल्याने आता राष्ट्रवादीला नव्या उमेदवारांची तयारी करावी लागेल.असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता खा. संजय मंडलिक हे शिंदे गटात गेल्यामुळे लोकसभेचे उमेदवार म्हणून आमदार हसन मुश्रीफ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

मात्र आपल्याला मुंबईसोडून दिल्लीला जाण्याची इच्छा नाही. लोकभा निवडणुकीत आपल्याला फारसा रस नाही. पण विधानसभेची अजून एक निवडणूक लढविण्याची आपली इच्छा हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. त्यावेळी पक्षाने आदेश आदेश दिल्यास त्याचे मला पालन करावे लागेल, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT