खासदार हेमंत गोडसे फुटले, मात्र शिवसैनिक जागचा हलला नाही.

काही नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा.
Hemant Godse
Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) वगळता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला हवा तसा प्रतिसाद शहरात (Nashik) मिळालेला नाही. तसे वरकरणी दिसतं असले तरी मोठा गट ‘वेट ॲन्ड वॉच' या भूमिकेत असल्याची माहिती शिवसेनेच्या (Shivsena) गटातून समोर येत आहे. १ ऑगस्टला अंतिम निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागल्यास मनात एक ओठावर वेगळे अशी भूमिका घेणारे एका तालात सुर व्यक्त करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (Supreme court`s decision may change game of shivsena rebel)

Hemant Godse
उद्धव ठाकरेंनी मिठी मारली, तुम्ही पाठीत खंजीर खुपसला!

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेला मोठे खिंडार पडले. चाळीस आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी शिवसेना संघटनेला आव्हान देत सत्ता स्थापन केली. त्या पाठोपाठ लोकसभेतही बारा खासदारांनी स्वतंत्र सवतासुभा निर्माण केला. शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिवसेना संघटनांतर्गत विविध क्रिया- प्रतिक्रिया उमटल्या. परंतु, शिवसेनेची ताकद असलेल्या नाशिकमध्ये मात्र खासदार हेमंत गोडसे वगळता कुठेही बंडाचे निशाण फडकले नाही व शिवसैनिक जागचा हलला नाही.

Hemant Godse
हेमंत गोडसे गेल्याने शिवसेनेला काडीचा फरक पडणार नाही!

शिदेंच्या समर्थनात नाशिक- पुणे महामार्गावर दोन फलक झळकले. परंतु, ज्यांची नावे समर्थनार्थ होती. त्यांची नावे पहिल्यांदा नाशिककरांना ऐकिवात आली. खासदार, आजी- माजी नगरसेवक, गटनेते, पक्ष प्रतोद, असा एकापाठोपाठ एक बंडाचा वणवा पेटत असताना, नाशिकचे शिवसैनिक मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे ठाम उभे राहिले.

आता जसे दिवस जात आहे व राज्यात एक-एक करून प्रमुख पदाधिकारी शिंदे यांच्या गटात सहभागी होत असताना एकसंध दिसणारे नाशिक मात्र काही प्रमाणात हलताना दिसत आहे. खासगीमध्ये काही जणांकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पक्ष एकसंध दिसत असला तरी यातील अनेक ऑगस्टच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या निकालाच्या प्रतीक्षेत असल्याचे समजते.

तिकीट वाटपानंतर चित्र होईल स्पष्ट

सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होतील, अशी दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत वेट ॲन्ड वॉचची भूमिका अनेकांनी घेतली आहे. निवडणुकीत तिकीट वाटपानंतर नाराज झालेले शिंदे गटात सहभागी होतील, अशी माहिती समोर येत आहे. पक्षांतर्गत स्पर्धेतून एकमेकांचा पत्ता कट करण्यासाठीदेखील शिंदे गटात चालल्याच्या अफवा पसरविल्या जात असल्याने संघटनेत अस्वस्थता वाढली आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com