Satej Patil, Rajesh Kshirsagar News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur politics : पाईपलाईनच्या श्रेयवादावरून कोल्हापूरचे राजकारण तापले : राजेश क्षीरसागरांचा सतेज पाटलांवर थेट 'वार'

Rajesh Kshirsagar News : कोल्हापुरकरांच्या आत्मियतेचा प्रश्न असलेल्या थेट पाईपलाईनचा शुभारंभ पुढील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापुरकरांच्या आत्मियतेचा प्रश्न असलेल्या थेट पाईपलाईनचा शुभारंभ पुढील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे राजकारण पाईपलाईनच्या श्रेयवादावरून तापले आहे. आमदार सतेज पाटील गटाच्या समर्थकांनी सोशल मीडियावरून शिंदे सरकारवर निशाणा साधल्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी थेट सतेज पाटलांनाच टार्गेट केले आहे.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर मी आमरण उपोषण केल्यानंतर खऱ्याअर्थाने थेट पाईपलाईनच्या प्रश्नाला सुरुवात झाली. कोल्हापुरातील थेट पाईपलाईन योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री मंत्री हसन मुश्रीफ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका घेतली. मात्र, कोल्हापुरच्या काही नेत्यांना असे वाटते की ,जे काही करतोय ते मीच करतोय. ते आमदार असताना थेट पाईपलाईनचा प्रश्न का सुटला नाही ? असा सवाल राजेश क्षीरसागर यांनी केला.

ज्यांनी केले, त्यांना आपण म्हटले पाहिजे सगळ्यांनी केलय. नाहीतर मी आणि मीच केले म्हणतो त्यांना कोल्हापुरची जनता योग्य वेळी धडा शिकवणार आहे. सगळ्यांच श्रेय यामध्ये आहे. एका कुणी श्रेय घ्यायचा प्रयत्न करु नये. त्यांनी टोल आणला, एलबीटी आणला. आम्ही चळवळीच्या माध्यमातून घालवला. चळवळीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना जाग करणे महत्त्वाचे असते ते आम्ही केले.

त्यावेळी सत्तेत असल्याने बंटी पाटलांचाही सहभाग होता. मीच प्रवृत्ती एक दिवस त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दात क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांना सुनावले आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यातून 30 हजारांहून अधिक शिवसैनिक आझाद मैदानावरील दसरा मेळाव्याला जाणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवसैनिक जातील, अशी माहिती क्षीरसागर यांनी दिली.

शिवतीर्थावर नेहमी शिवसेना प्रमुखांच्या मुखातून प्रखर हिंदुत्वाचे, देशभक्तीचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक जायचे. त्यामुळे ठाकरे गटाचे उरलेले शिवसैनिक आझाद मैदानावरील दसरा मेळाव्याला येतील. कारण त्यांच्यामध्ये संभ्रम सुरू आहे, कुणाचे विचार ऐकायचे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, फारुक अब्दुला का ? काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांचे विचार ऐकायचे. आयुष्यभर शिवसेना (Shivsena) प्रमुखांनी ज्यांना नाकारले त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत. त्यामुळे शिवसैनिक निराश झाला आहे. राज्यातून लाखो शिवसैनिक आझाद मैदानावर दसरा मेळाव्याला उपस्थिती लावणार, असा दावा क्षीरसागर यांनी केली.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT