Nana Patole News : देशातील बंदरे मित्रांना दिल्यापासूनच ड्रग्जचे विष पसरण्यास सुरुवात ; पटोलेंचा मोदींवर हल्लाबोल

Maratha Reservation News : गेली दहा वर्षे केंद्रात भाजपचे सरकार असूनही त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही, असा सवाल पटोले यांनी केला.
Nana Patole News
Nana Patole NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात सध्या आरक्षणावरून मराठा व ओबीसी समाज एकमेकांसमोर उभे ठाकले असून ट्रिपल इंजिन सरकारची याप्रश्नी स्पष्ट भूमिका नसल्याने हा गुंता वाढत चालला आहे, असा हल्लाबोल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुंबईत आज (ता.२३) केला. गेली दहा वर्षे केंद्रात भाजपचे सरकार असूनही त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही, असा सवाल त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागच्याच महिन्यात झालेल्या संसदेच्या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असता, तर हा प्रश्न निकाली निघाला असता, असे पटोले म्हणाले. आता, मात्र मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याने पन्नास टक्के आरक्षण उठण्याविषयी त्यांनी साशंकता व्यक्त केली. या प्रश्नी राज्य सरकारमध्येच एकवाक्यता नसून मंत्री बोलतात एक, तर दुसरीकडे सरकार जाहिरातीतून वेगळाच संदेश देते. त्यामुळे याबाबत ठोस भुमिका मांडून मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवावी, असे ते म्हणाले.

Nana Patole News
PM Modi Shirdi Visit: मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनात निरुत्साह; मंत्री विखेंनी भर बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांना झापले

मराठा आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सांगत आहेत, मग मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून त्यांना कोणी रोखले आहे का ? अशी विचारणा पटोलेंनी केली. एकाचे आरक्षण काढून दुसऱ्याला देणे हे चुकीचे आहे, ही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडलेली भूमिका, मात्र योग्य आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काय करतात ते कळतच नाही आणि दुसरे उपमुख्यमंत्री वेगळेच बोलतात, असा टोला त्यांनी लगावला. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर ‘जातीनिहाय जनगणना करावी आणि आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा हटवावी’या राहुल गांधींच्या मागणीला सर्वांनी पाठिंबा दिला, तर हा प्रश्न मार्गी लागेल, असे ते म्हणाले.

जेव्हापासून देशातील बंदरे मित्रांना दिली गेली, तेंव्हापासून देशभरात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात येत आहे. या सर्वांचे मूळ या खाजगी बंदरांमध्ये आहे. भाजप (BJP) सरकार तरुणांना ड्रग्ज व बिअर उपलब्ध करुन देऊन नशेत डुबवण्याचे पाप करत आहे. शिंदे सरकारने, तर आता बियरच्या किमती कमी करण्यासाठी समिती नेमली आहे. उद्या हे सरकार रेशनवरही बिअर देईल, पाण्याच्या जागी बिअरच प्या, असेही धोरण आणतात की काय ? असा प्रश्न आहे. भाजपचे सरकार तरुण पिढीला बरबाद करण्याचे काम करत आहे हा आरोप नसून वस्तुस्थिती आहे, असे पटोले म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

Nana Patole News
Devendra Fadnavis Caste Census : अजितदादा म्हणाले, एकदा जातीनिहाय जनगणना होऊच द्या; पण, फडणवीसांचे सावध पाऊल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com