Uddhav Thackeray Shivsena Leaders And Karnatak Former Ministers.jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: कोल्हापुरात सीमावाद पेटला! शिवसैनिकांनी कर्नाटकच्या माजी मंत्र्यांना अंबाबाई मंदिर परिसरातच अडवलं अन्...

Maharashtra - Karnatak Border Issue : बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीने 9 डिसेंबर रोजी सीमा प्रश्नावर महामेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावत प्रवेशबंदी केली होती. त्यानंतर ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाले होते.

Rahul Gadkar

Kolhapur News : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कर्नाटक प्रशासनाने अडवल्यानंतर आता ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाला आलेल्या भाजपच्या (BJP) माजी मंत्र्यांना ठाकरेंच्या शिवसेनेने अडवून जाब विचारला.

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीने 9 डिसेंबर रोजी सीमा प्रश्नावर महामेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात प्रवेशबंदी केली होती. त्यानंतर ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाले होते. आज कर्नाटकचे माजी मंत्री आणि आमदार कोल्हापुरात येताच ठाकरेंच्या शिवसैनिकांनी चांगलेच सुनावले.

कर्नाटक प्रशासनाने 9 डिसेंबरला महाराष्ट्रातील नेत्यांना राज्यात बंदी घातल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला जाणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला कोगनोळी टोल नाक्यावर अडवण्यात आले होते. यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटकात घुसण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, कर्नाटक प्रशासनाने पोलीस दलाचा दबाव वापरत ठाकरेंच्या शिवसैनिकांना रोखले होते. कर्नाटक प्रशासनाची सुरू असलेली दादागिरी हाणून पाडावी, अशी मागणी करत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष मंजीत माने यांनी कर्नाटक शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.

दरम्यान, कर्नाटकचे भाजपचे माजी मंत्री सुरेंद्र चव्हाण, सुनील कुमार हे बुधवारी(ता.11) करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येणार असल्याची कुणकुण उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना लागली होती. त्यामुळे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, मंजीत माने यांनी अंबाबाई मंदिरात येत कर्नाटकच्या माजी मंत्र्यांना अडवले.

...तर महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही!

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी कर्नाटकच्या माजी मंत्र्यांना महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी घालण्यावरुन चांगलंच झापलं.ते म्हणाले,कर्नाटक प्रशासन दडपशाही वापरून मराठी भाषकांवर अन्याय करत असेल, तर महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही. ज्या पद्धतीने आम्हाला कर्नाटकात बंदी घातली, त्याच पद्धतीने तुम्हाला आम्ही महाराष्ट्रात येण्यापासून बंदी का घालू नये? असा सवाल देवणे यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने तात्काळ याबाबत पावले उचलावीत, अशी मागणी ही विजय देवणे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT