Kalamba Jail Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : कैद्यांना मोबाईल देणं भोवलं! कळंबा कारागृहातील 2 अधिकारी आणि 9 कर्मचारी बडतर्फ

Rahul Gadkar

Crime News : कळंबा कारागृहाच्या भिंतींना अक्षरशः भ्रष्टाचाराने पोखरले आहेत. कारागृहाचे अधीक्षक क्षमाकांत शेडगे यांनी केलेल्या सर्च मोहिमेत गेल्या 25 दिवसांपासून 80 मोबाईल कायद्यांकडून जप्त करण्यात आले आहेत. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर कळंबा कारागृहातील दोन अधिकारी आणि नऊ कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाईनंतर कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

कळंबा कारागृहाच्या कारभाराने राज्यातील कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. कळंबा मध्यवर्ती कारागृहातील शोध मोहिमेत 25 दिवसात 80 मोबाईल सापडल्याने गृहखात्यान कडक पाऊले उचलली आहेत. संबंधित कारागृह प्रशासनातील दोषींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

त्या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी झाल्यानंतर कारागृहातील 2 अधिकारी आणि 9 कर्मचारी दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह प्रशासन) अमिताभ गुप्ता Amitesh Gupta यांच्या आदेशानुसार दोन वरिष्ठ तुरुंगाधिकार्‍यांसह 11 जणांना बडतर्फ करण्यात आले आहे. शिवाय आणखी काही अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत.

वरिष्ठ तुरुंग अधिकारी सोमनाथ म्हस्के, सतीश कदम, कर्मचारी तानाजी गायकवाड, रवी पवार, वैभव पाटील, अनिकेत आल्हाट, वैशाली पाटील, सुहास वरखडे, संजय टिपुगडे, स्वप्नील हांडे अशी बडतर्फ झालेले कर्मचारी आहेत. याशिवाय आणखी दोन अधिकार्‍यांसह पाच कर्मचार्‍यांची वरिष्ठस्तरावर चौकशी सुरू आहे. चौकशीत दोषी ठरल्यास संबंधित कारवाईच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अधिकारी, कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT