Jayshree Jadhav  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayshree Jadhav : कोल्हापूरात पावसाने दाणादाण! आमदार जयश्री जाधव 'ऑन फिल्ड', प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

Jayshree Jadhav kolpur Rain : पुरबाधित नागरिकांसाठी सुसज्ज निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करा, अशा सूचना आमदार जयश्री जाधव यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

Rahul Gadkar

Jayshree Jadhav News : कोल्हापूर शहर महापुराच्या उंबरठ्यावर आहे. पावसाचा जोर कायम असल्याने शहर वस्तीत पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे. दसरा चौक येथील सुतारवाड्यातील जवळपास 16 कुटुंबियांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

दरम्यान कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव फिल्डवर उतरल्या असून स्थलांतरित कुटुंबीयांची भेट घेऊन प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला सूचना देत स्थलांतरित कुटुंबांची योग्य देखभाल घेऊन इतर परिसरात सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत.

शहरातील पुराचा धोका प्रत्येक वर्षी वाढत आहे. यामुळे पूरबाधित नागरिकांसाठी सुसज्ज निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करा, अशा सूचना आमदार जयश्री जाधव यांनी आज महापालिका प्रशासनाला दिल्या. निवारा केंद्रास निधी मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले.

पुराने धोका पातळी गाठली असल्याने शहरातील विविध भागांतील पूरग्रस्तांसाठी ठिकठिकाणी 31 निवारा केंद्रे सज्ज केली आहेत. आज (गुरुवारी) सुतारवाड्यातून चित्रदुर्ग मठात आलेल्या स्थलांतरित केलेल्या नागरिकांशी आमदार जयश्री जाधव यांनी संवाद साधला. या संकटकाळात पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगित त्यांना धीर दिला.

आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, पूरस्थितीसाठी महापालिकेने सर्व यंत्रणा सतर्क करावी, निवारा केंद्रात नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रत्येक वर्षी पुरामुळे नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. यासाठी महापालिका प्रशासनाकडे आरक्षित असलेल्या जागांवरती निवारा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा आणि तो शासनास सादर करावा.

या प्रस्तावास मंजुरी मिळावी आणि निधी मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन जाधव यांनी दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपशहर अभियंता आर. के. पाटील उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT