Kolhapur Shahi Dasara Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Dasara Sohala : करवीर जनतेच्या साक्षीने होणार दसरा सोहळा, शाही दसऱ्याची तयारी पूर्ण

Rahul Gadkar

Kolhapur Dasara Chowk Celebration : कर्नाटकातील म्हैसूरच्या दसऱ्या पाठोपाठ कोल्हापूरचा शाही दसरा महत्त्वाचा मानला जातो. भारतात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्यांपैकी दोन नंबरचा दसरा सोहळा हा कोल्हापूरच्या दसरा चौकात पार पडतो. यंदाही हा सोहळा मोठ्या थाटामाटात व पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. मागील एक वर्षांपासून कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यात राज्य शासनानेही सहभाग घेतल्याने शासनाच्या वतीनं जोरदार तयारी करण्यात आली आहे. सायंकाळी ५ वाजता सूर्यास्ताच्या साक्षीने शमीपूजनाचा कार्यक्रम होऊन, सीम्मोल्लंघन करून सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी राजघराण्या प्रती करवीरची जनता आपली मानवंदना अर्पण करते.

शासनाकडून विशेष प्रयत्न

तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाप्रशासनाने दसरा महोत्सव जागतिक पातळीवर नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. गेल्या दहा दिवसापासून विशेष सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक उपक्रम रावबून दसरा महोत्सव जोरात साजरा केला. आजही छत्रपती घराण्याची मिरवणूक ही शाही पद्धतीने निघावी यासाठी शासनाने नियोजन केले आहे.

शासनाच्या वतीनं जोरदार तयारी

यंदा कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यात राज्य शासनानेही सहभाग घेतल्याने शासनाच्या वतीनं जोरदार तयारी करण्यात आली आहे. छत्रपती घराण्याची मिरवणूक ही शाही पद्धतीने निघावी यासाठी शासनाने नियोजन केले होते. यानुसार यावेळी सायंकाळी ५ वाजता निघणाऱ्या शाही मिरवणुकीत सजवलेले उंट, मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा मिरवणुका उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेणार आहेत.

पोलिसांची मानवंदना अन् पोलीस अधीक्षकांची पाहणी

ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा महोत्सव होणार असल्याने या ठिकाणची पाहणी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केली. वाहतुकीत विस्कळीत होऊ नये यासाठी दसरा चौक मैदानापासून ५०० मीटरच्या परिघामध्ये नो पार्किंग झोन करण्यात येणार आहे. तर अंबाबाई मंदिरातून येणाऱ्या पालखीमार्ग असलेल्या ठिकाणी आणि राजघराण्यातील सदस्य ज्या मार्गावरून दसरा चौक मैदानाकडे येतात अशा मार्गांवर पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. तर राजवाड्यातून येणाऱ्या मार्गवर पोलिसांच्या ताफ्यातून स्वारी येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT