Kolhapur News .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News: धक्कादायक! कोल्हापुरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उंदरांची दहशत, सहा विद्यार्थिनींचे हात-पाय कुरतडले

Kolhapur ZP Krida School: कोल्हापुरातील शिंगणापूर गावातील जिल्हा परिषदेच्या क्रीडा शाळेत उंदरांची दहशत निर्माण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे उंदरांनी सहा विद्यार्थीना जखमी केले असून त्यांच्या हाताला आणि पायाला कुरतडल्याची बाब समोर आली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: कोल्हापुरातील शिंगणापूर गावातील जिल्हा परिषदेच्या क्रीडा शाळेत उंदरांची दहशत निर्माण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे उंदरांनी सहा विद्यार्थीना जखमी केले असून त्यांच्या हाताला आणि पायाला कुरतडल्याची बाब समोर आली आहे.

कोल्हापुरातील शिंगणापूर राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेतील हा संतापजनक प्रकार असून शाळा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने याकडे केवळ डोळेझाक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे उंदरांच्या पाठीमागून या शाळेमध्ये सापांची वरदळ वाढल्याने विद्यार्थी सध्या भीतीच्या छायेत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर परिसरातील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेत एक अत्यंत संतापजनक आणि भीतीदायक प्रकार समोर आला आहे. गेल्या आठवडाभरात सहा विद्यार्थिनींचा उंदरांनी चावा घेतला आहे.

विशेष म्हणजे, बुधवारी एकाच रात्री चार विद्यार्थिनींना उंदरांनी कुरतडले आहे. गेल्या वर्षभरापासून या शाळेत हा प्रकार घडत असून विद्यार्थिनींना रेबीज आणि इतर इंजेक्शन देण्याचा प्रकार झाला आहे.

संस्कृती कृष्णा पारळे या विद्यार्थिनीने सांगितले की, उंदरांचा वावर प्रचंड वाटला आहे आणि त्याचा त्रास या ठिकाणच्या विद्यार्थिनींना रोज सहन करावा लागत आहे. मला गेल्या एका वर्षात तब्बल तीन वेळा उंदीर चावला आहे. प्रत्येक वेळी तिला रेबीज आणि टीटीची इंजेक्शने घ्यावी लागली आहेत.

सध्या 7 वी, 8 वी आणि 10 वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या हाताला आणि पायाच्या टाचांना उंदरांनी लक्ष्य केले असून, एका विद्यार्थिनीच्या पायाची टाच तर उंदरांनी कुरतडून काढल्याची माहिती एका बाधितेने दिली आहे.

उंदरांच्या मागोमाग सापांचा वावरही वसतिगृहात वाढला आहे. उंदरांच्या शिकारीसाठी साप थेट खोलीत येत आहेत. रात्री झोपेत असताना बेडवर साप येतात, त्यामुळे प्रचंड भीती वाटते," असे एका विद्यार्थिनीने सांगितले. त्यांच्या अभ्यासावरही याचा विपरीत परिणाम होत आहे.

आपल्या मुली खेळाडू बनून चमकतील या आशेने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पालकांनी त्यांना येथे पाठवले, मात्र आता मुलींच्या जिवावर बेतत असल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाण्याची तयारी सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT