Shivsena UBT Politics News : कोल्हापूरमध्ये काय घडत आहे? हे साहेबांना सांगणं माजी खासदार विनायक राऊत आणि संपर्कप्रमुख यांची जबाबदारी होती. मात्र उद्धव ठाकरे यांचं मोठेपण आहे, की ते आपल्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला बदनाम होऊ नये म्हणून ते स्वतःवर सगळं घेतात. मात्र 'आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं' आहे, हे सत्य आहे. यामुळे आम्ही त्यांना काहीही बोलू शकत नाही, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय पवार यांनी इतर नेत्यांवर बोचरी टीका केली आहे. त्यांनी एका प्रकारे शिवसेनेला घरचा आहेर दिला असून त्यांचे अशा बोलण्यातून मोठे संकेत मिळत असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
कोल्हापुरातील 50 ते 60 पदाधिकारी आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो. 40 ते 50 मिनिट झालेला बैठकीत कोल्हापुरात काय घडत आहे हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र उद्धव ठाकरे यांचा मूड मी निर्णय घेतलेला आहे असा होता. ते फक्त इस अल्वेज राईट असे म्हणत होते. तर आम्हीही ओके म्हटलं. आणि कोल्हापुरचा रस्ता धरला. मात्र या निर्णयामुळे कोल्हापुरात पुढील काळात काय घडेल हे आम्ही सांगितलं. साहेबांचं मन मोठा आहे. त्यांनी आपल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करून आपण निर्णय घेऊ असेही सांगितल्याचे पवार म्हणाले.
यावेळी त्यांनी कोल्हापूरचा आणि मातोश्री यामध्ये जो पूल तयार झाला आहे. त्याचं ऑडिट होण गरजेचे असल्याची प्रतिक्रियाही दिली आहे. तसेच सध्या फक्त कोल्हापुरातच नाही तर सगळीकडेच असे घडत आहे. सत्ता असो किंवा नसो अनेक चढउतारा मी बघितले. तरीही साहेबांसोबत आम्ही ठाम राहिलो पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. 36 वर्ष काम करून देखील उपनेत्याची भूमिका तुम्ही ऐकून घेणार नसाल तर याचं वाईट वाटतं, असल्याचेही खंत पवार यांनी यावेळी बोलून दाखवली आहे.
तसेच आमचा नावाला विरोध नाही, मात्र जी प्रक्रिया झाली त्याला आमचा विरोध आहे. विधानसभेला देखील हाच प्रकार घडला. अनेक जण इच्छुक होते. मुलाखत घेतली वातावरण तयार केलं. मात्र पद्धतशीरपणे षडयंत्र रचून विरोधकाला कसा फायदा होईल तोच प्रयत्न करण्यात आला असाही आरोप संजय पवार यांनी केला.
हे आत्ताच नाही तर दहा-बारा महिने, अनेक वर्षांपासून सुरू आहे. तुम्ही आमचं ऐकणार नसाल तर आमची व्हॅल्यू तिथे कमी झाली आहे का? आता असं वाटू लागलं आहे. कोल्हापूर ते मातोश्री झालेल्या पूलच ऑडिट होणं गरजेचं आहे. या पूलला कुठे कीड लागली आहे का? कुठे गंज लागला आहे का? हे पाहणं गरजेचं आहे. या पूलाचा त्रास आम्हा शिवसैनिकांना होत आहे. यामुळे कोणाचातरी फायदा होत असेल आणि पक्षाचा नुकसान होत असेल तर ते होऊ नये, अशी आमची भावना आहे. पक्षप्रमुख जो उमेदवार देतील त्याच्यासाठी मी यापुढे राबणार आणि निवडून आणण्याचा प्रयत्न करणार, मी उपनेते पद सोडलेलं आहे. मी सामान्य शिवसैनिक म्हणून आता काम करणार आहे.
माझ्यासाठी उद्धव ठाकरे रामचंद्र प्रभू आहेत. मी त्यांचा हनुमान आहे. मात्र तरीही आपलं तिथे काही ऐकलं जात नसेल तर प्रत्येक जण आपला आपला विचार करतो. अनेक लोक निघून का जात आहेत? त्यांच्या मनात असं पाप का येत आहे? याचा विचारही व्हायला हवा. पण अद्याप तरी माझ्या मनात असला कोणतंही पाप निर्माण झालेलं नसल्याचेही संजय पवार यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.