Kolhapur Mahayuti seat sharing KMC Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Mahayuti Formula : कोल्हापूरचा तिढा सुटला! महायुतीचा 'फायनल फॉर्म्युला' तयार; थोड्याच वेळात मोठी घोषणा?

Kolhapur political deadlock resolved : कोल्हापूरच्या राजकारणातील तिढा सुटण्याच्या मार्गावर असून महायुतीचा अंतिम फॉर्म्युला ठरला आहे. थोड्याच वेळात मोठी घोषणा होण्याची शक्यता.

Rahul Gadkar

Kolhapur Municipal Elections Mahayuti: कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जागा वाटपाबाबत फॉर्मुला ठरला आहे. तर जनसुराज्य राज्य शक्तीला देखील महायुतीमध्ये घेण्याचा विचार सुरू आहे. 81 पैकी 79 जागांवर महायुतीचे एकमत झाले असून उर्वरित वादाच्या दोन जागांवर आज 11 वाजेपर्यंत निर्णय शक्य आहे. त्यानंतर महायुतीकडून पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला महायुती मधील जागा वाटपाचा तिढा अखेर मार्गी लागला आहे. उमेदवारी अर्ज करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असल्याने कालचा रविवार हा महायुतीसाठी बैठकींचा मॅरेथॉन वार ठरला. काल दिवसभरात शिरोली, कोल्हापूर जिल्हा बँक ठिकाणी बैठकीचा धडाका सुरू होता.

रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. एकंदरीतच महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच एकत्र लढण्याचा निर्णय एकमताने या बैठकीत घेण्यात आला. तर गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपा संदर्भातील तिढा कायम होता. भाजपकडून 35, शिवसेनेकडून 33, आणि राष्ट्रवादीकडून 20 जागांचा दावा करण्यात आला होता. तिन्ही पक्ष जागावाटपावर ठाम असल्याने त्यातून एकमत होत नसल्याने हा गुंता कायम राहिला होता.

त्यामुळे इच्छुकांचा जीव देखील टांगणीला लागला होता. त्यातच काल दिवसभरात दोन ते तीन बैठका घेत महायुतीने यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. महायुतीचा फॉर्मुला जवळपास निश्चित झाला असून भाजप 35, शिवसेना 31 राष्ट्रवादीला 15 जागा देण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.

मात्र आज 11 वाजता पुन्हा बैठक होऊन यामध्ये कमी जास्त जागांवर विचार केला जाणार आहे. त्यानंतर एकत्रित पत्रकार परिषद घेऊन संदर्भातील घोषणा दुपारी 12:00 वाजेपर्यंत करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवाय 79 जागांच्या उमेदवारांबाबत महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे एकमत झाले असून त्वरित दोन जागांवर शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच निर्माण झाली आहे. यासंदर्भातील लवकरच मार्ग निघणार असून पार पर्यंत उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणूक जागावाटपाबाबत तब्बल काल 7 तास महाडिक पेट्रोल पंपावर चालेल्या महायुतीच्या घटक पक्षांच्या बैठकीत 79 जागांवर युतीचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली, तर 2 जागांचा तिढा रात्री उशिरापर्यंत सोडवण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत बैठक सुरू होती.

दरम्यान, एकमत झाल्यामुळे भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेना सोमवारी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करण्याची शक्यता आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मॅरेथॉन बैठक झाली.

यावेळी जनसुराज्यचे विनय कोरे, प्रभारी अतुल भोसले, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, विजय जाधव, महेश जाधव, शारंगधर देशमुख, आदिल फरास यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT