Amit Shah on Waqf Board Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Waqf Amendment Bill : लोकसभेत वक्फ सुधारणा बिलावर चर्चा; अमित शहांनी थेट सभागृहात दिला कोल्हापुरातील 'या' मंदिराचा दाखला

Amit Shah on Waqf Board Reform Bill : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरमधील वडणगे गावातील प्राचीन अशा शंभु महादेवाच्या मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला होता. गेल्या 25 वर्षापासून त्या संदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मागील वर्षभरात हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवल्यानंतर या लढ्याला तीव्र स्वरूप प्राप्त झाले होते.

Rahul Gadkar

Kolhapur News, 03 Apr : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरमधील वडणगे गावातील प्राचीन अशा शंभु महादेवाच्या मंदिरावर वक्फ बोर्डाने (Waqf Board) दावा केला होता. गेल्या 25 वर्षापासून त्या संदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मागील वर्षभरात हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवल्यानंतर या लढ्याला तीव्र स्वरूप प्राप्त झाले होते.

वक्फ बोर्डकडून दावा केल्यानंतर सातत्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करत आपला लढा सुरूच ठेवला होता. अशातच आता वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं आणि ते आता मंजूर देखील झालं आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

त्यातच केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बुधवारी या बिलावर चर्चा करताना लोकसभा सभागृहात कोल्हापुरातील वडणगे गावचे उदाहरण दिलं. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कृषी सर्व्हे क्रमांक 89 ही वडणगे गावातील जमीन ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे. मात्र वक्फ बोर्डाने 25 वर्षांपूर्वी या जमिनीवर दावा केल्यानंतर त्याबाबत न्यायालयात त्याची सुनावणी सुरू होती.

मध्यंतरीच्या काळात ग्रामपंचायतीने आपली बाजू भक्कमपणे न मांडल्याने ग्रामस्थांकडून संतप्त भावना व्यक्त होत होत्या. ही गोष्ट हिंदुत्ववादी संघटनेला लक्षात आल्यानंतर मागील वर्षी 24 मे रोजी संपूर्ण गाव बंद पाडून या घटनेचा निषेध केला होता.

बुधवारी लोकसभेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर करताना महाराष्ट्रातील दोन उदाहरणं दिली. त्यामध्ये कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील वडणगे गावाचा उल्लेख करण्यात आला होता.

या गावातील महादेव मंदिराच्या जागेवर वक्फ बोर्डाने दावा सांगितल्याचा आरोप त्यांनी केला. हे विधेयक सादर करत असताना सर्व खासदारांनी या चर्चेत सहभाग घेतला. दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीच कोल्हापुरातील वडणगे गावाचा उल्लेख केल्यामुळे आता या गावातील मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT