Manipur President Rule : मागील अनेक दिवसांपासून अशांत आणि हिंसाचाऱ्याच्या आगीत होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट (Manipur President Rule) लागू करण्याचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला ठाकरेंच्या शिवसेनेने देखील पाठिंबा दिला आहे. बुधवारी मध्यरात्री राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
बुधवारी (ता.02) मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीला अनुमोदन देण्याचा प्रस्ताव ठेवला. यावेळी शाह म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयानंतर जातीय हिंसा भडकली. या दंगली किंवा दहशतवाद नाही. उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा अर्थ लावण्यावरून दोन समुदायामध्ये जातीय हिंसा भडकली.
सर्वांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. मणिपूरमध्ये मागील 4 महिन्यांपासून हिंसाचार झालेला नाही. मात्र, तिथली परिस्थिती समाधानकारक आहे असं मी म्हणणार नाही. परंतू आता ती नियंत्रणात आहे. शिवाय मणिपूरमध्ये (Manipur) शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करत असल्याचं शाह म्हणाले.
शाह यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव मांडला या प्रस्तावाला ठाकरेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिला. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अमित शाह हे खंबीर गृहमंत्री आहेत, असं म्हणत त्यांचं कौतुक केलं.
दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचारात 260 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. शिवाय जातीय हिंसा होते तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित होतात. याला पक्षाशी जोडू नका, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला. तर यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रधानमंत्री मणिपूरला कधी गेले नसल्याची आठवण करून देत आम्ही राष्ट्रपती राजवटीचे समर्थन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
तर सभागृहात बोलताना सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांकडून जास्त अपेक्षा असून अमित शाह हे खंबीर गृहमंत्री आहेत ते मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करतील अशी आशा आम्हाला आहे. तसंच शहांनी काश्मीरमध्ये उत्तम रिझल्ट्स दिले. पण, मणिपूरवर आम्ही समाधान नाही. सरकार एक देश एक निवडणुकीवर चर्चा करत आहे. मात्र, राष्ट्रपती राजवट लावावी लागते हे सशक्त लोकशाहीसाठी चांगलं नाही, असंही सुळे म्हणाल्या.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.