kolhapur Vidhansabha Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

kolhapur Vidhan Sabha : ऐन पावसाळ्यात करवीरचं वातावरण तापलं, इच्छुकांने लावलं सॉलिड पोस्टर!

kolhapur Vidhan Sabha : करवीर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवाराने हे पोस्टर लावण्याने करवीर तालुक्यात आणि गावागावात चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टरने करवीरच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

Rahul Gadkar

kolhapur Vidhansabha : आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे 60 ते 70 दिवस शिल्लक असताना करवीर विधानसभा मतदारसंघातील वातावरण पावसाळ्यातच तापायला सुरुवात झाली आहे. करवीरचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर करवीर विधानसभा मतदारसंघातील पाटील कुटुंबांचा राजकीय वारसदार राहुल पाटील यांची निवड झाली. मात्र एका इच्छुक उमेदवाराने आपली झलक दाखवत मतदारसंघात लावलेल्या पोस्टरने करवीरच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवाराने हे पोस्टर लावण्याने करवीर तालुक्यात आणि गावागावात चर्चेचा विषय ठरत आहे.

आगामी विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आतापासूनच ढवळायला सुरुवात झाली आहे. ऐन पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात या मतदारसंघातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असल्याचे चित्र आहे. कारण करवीर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील (P N Patil) यांच्या निधनानंतर पोकळी निर्माण झालेल्या काँग्रेसला राहुल पाटील यांच्या रूपाने नवा चेहरा मिळाला आहे. अशातच गेल्या काही वर्षांपासून आमदारकींची स्वप्ने पाहणाऱ्या कार्यकर्ते आणि इच्छुकांनी आपल्या भावना पोस्टरच्या माध्यमातून व्यक्त केले आहेत.

करवीर विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवाराने मला मोठा पोस्टर लावून मतदारांचे लक्ष आकर्षित करून घेतले आहे. या इच्छुक उमेदवाराने होर्डिंग लावत थेट विधानसभा निवडणुकीत शड्डू मारण्याचा बेत आखाला आहे. हा पोस्टर कोणी लावला हे समोर आलं नसलं तरी अज्ञात व्यक्तीचे चेहरा या पोस्टरवर आहे. तसेच 'स्वाभिमानी करवीर करांना हवा विकासाचा चेहरा नवा, असा आशयाचा वाक्य लिहित थेट प्रस्थापितांना इशारा दिला आहे.

सध्या करवीरच्या राजकारणात विधानसभेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. काँग्रेसकडून (Congress) आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील गावोगावी प्रचार दौरे करत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार चंद्रदिप नरके यांनी यापूर्वीच शड्डू ठोकून संपर्क दौऱ्याला सुरुवात केली आहे. अशातच करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये जनसुराज्य शक्तीच्या माध्यमातून तिसरा उमेदवार म्हणून संताजी घोरपडे (Santaji Ghorpade) हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर चौथ्या उमेदवाराने आपला अज्ञात चेहरा उघड न करता थेट पोस्टरबाजी करत मैदानात उतरणार असल्याची घोषणा करून टाकली आहे. त्यामुळे सध्या या पोस्टरची चर्चा मतदारसंघात जोरात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT