Violence at Vishalgad Fort : इकडे मतदारसंघ हिंसाचाराने धुमसतोय, तिकडे आजी- माजी खासदारांचे मौन

Vishalgad Illegal Encroachment : विद्यमान आमदार उद्योगपतींच्या लग्नात आणि मतदारसंघातील सत्कार समारंभात व्यस्त आहेत. तर माजी खासदारांनी देखील या घटनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
Dhairyasheel Mane, Raju Shetti, sambhajiraje Chhatrapati
Dhairyasheel Mane, Raju Shetti, sambhajiraje ChhatrapatiSarkarnama
Published on
Updated on

Vishalgad Illegal Encroachment : किल्ले विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमणावरून झालेल्या हिंसाचाराने गजापूर पैकी मुसलमान वाडी आज ही आगीने धुमसत आहे. ज्या मुसलमान वाडीचा अतिक्रमणाशी कोणताही संबंध नसताना जमावांकडून जवळपास 20 ते 25 घरांना लक्ष करण्यात आले. कोट्यावधीचं नुकसान करून वाहनांची तोडफोड करण्यात आली.

आजही या गावातील अनेक कुटुंब दहशतीखाली आहेत. पै आणि पै गोळा करून फुलवलेला संसार जमावांकडून भुईसपाट करण्यात आला. इकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ही मुसलमान वाडी आजही धुमसत असताना, तिकडे विद्यमान आमदार उद्योगपतींच्या लग्नात आणि मतदारसंघातील सत्कार समारंभात व्यस्त आहेत. तर माजी खासदारांनी देखील या घटनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ (Loksabha Constituency) क्षेत्रात गजापूर पैकी मुसलमानवाडीचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून किल्ले विशाळगड आणि पायथ्यावरील दिलेल्या 158 अतिक्रमणधारकांविरोधात लढा सुरू आहे. रविवारी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर या लढ्याला हिंसक वळण लागले.

ज्याचा अतिक्रमण बाबत कोणताही संबंध नाही अशा मुसलमान वाडी या गावातील वीस ते पंचवीस कुटुंब यांची राहती घर उध्वस्त करण्यात आली. वाहने जाळण्यात आली. मतदारसंघात इतका हिंसाचार होत असताना विद्यमान खासदार धैर्यशील माने मात्र उद्योगपतींच्या लग्नात व्यस्त होते. इतकेच नव्हे तर या दौऱ्यानंतर या घटनास्थळी भेट देण्याऐवजी त्यांनी मतदारसंघातील सत्कार समारंभाला उपस्थिती लावली.

Dhairyasheel Mane, Raju Shetti, sambhajiraje Chhatrapati
Satej Patil : विशाळगड प्रकरणात सतेज पाटील आक्रमक, थेट 'एसपी'ची बदली करण्याची केली मागणी

मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असताना लोकप्रतिनिधीने शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयमाची भूमिका घेऊन प्रयत्न करणे गरजेचे होते. शिवाय प्रतिनिधी म्हणून मुसलमान वाडीतील नागरिकांना आधार देण्याची गरज होती.

किंवा त्या घटनेबाबत शोक व्यक्त करणे गरजेचे होते. मात्र त्याबाबत कोणताच विचार विद्यमान खासदारांचा दिसत नाही. त्याचे गांभीर्य विद्यमान खासदारांना नाही का? सवाल मुसलमानवाडीतील पीडित कुटुंबियांनी केला.

इतकेच नव्हे तर माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी देखील या प्रकरणावर मौन बाळगले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले शेट्टी यांनी या घटनेबाबत साधा चकार ही शब्द काढलेला नाही. इतकेच नव्हे तर या घटनेचा निषेध नोंदवलेला नाही. तर शाहूवाडीचे विद्यमान आमदार विनय रावजी कोरे यांनी देखील या घटनेबाबत मौन बाळगले आहे.

Dhairyasheel Mane, Raju Shetti, sambhajiraje Chhatrapati
Video Vishalgad Fort : मोठी बातमी! विशाळगडावर जाण्यापासून शाहू महाराजांसह नेत्यांना पोलिसांनी रोखलं

तीन दिवसात विद्यमान खासदारांनी केलेले दौरे

रविवारी हुतात्मा शिक्षण व उद्योग समुह द्वारा आयोजित पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या 102 व्या जयंती समारंभानिमित्त पार पडला. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमास विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी उपस्थिती लावली होती.

आष्टा येथे मंजूर केलेल्या शासनाच्या नगर विकास विभागातर्फे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या 35 लाख रुपये खर्चाच्या शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे सार्वजनिक वाचनालयाच्या बांधकामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. तर सोमवारी शिवाजी पेठ येथे ईपीएस- 95 पेन्शन धारकांच्या मेळाव्याला उपस्थिती लावली होती. तर मंगळवारी रूकडी येथे मेळाव्यात उपस्थिति लावली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com